दत्तवाड-एकसंबा बंधाऱ्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:25 IST2021-08-26T04:25:59+5:302021-08-26T04:25:59+5:30
दत्तवाड : नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात दत्तवाड-एकसंबादरम्यान असलेल्या दुधगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला वाळलेले झाड व त्याच्या फांद्या येऊन ...

दत्तवाड-एकसंबा बंधाऱ्याला धोका
दत्तवाड : नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात दत्तवाड-एकसंबादरम्यान असलेल्या दुधगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला वाळलेले झाड व त्याच्या फांद्या येऊन अडकल्याने धोका निर्माण झाला आहे.
दत्तवाड-एकसंबादरम्यान दुधगंगा नदीवर महाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे विभागाचा शेवटचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे कर्नाटकात जाणारे पाणी थांबविण्यास मदत होते, तर दत्तवाड येथील शेती सिंचनाला याची मोठी मदत झाली आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरात या बंधाऱ्याला वाळलेली झाडे व फांद्या घेऊन अडकल्याने धोका निर्माण झाला आहे. सध्या पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने हा धोका आणखीन वाढला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात अडकलेली झाडे व फांद्या काढाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
फोटो - २५०८२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - दत्तवाड-एकसंबा बंधाऱ्याला झाडांच्या फांद्या अडकल्या आहेत. (छाया - मिलिंद देशपांडे, दत्तवाड)