दांडियाच्या ठेक्यावर थिरकल्या सखी..!
By Admin | Updated: October 20, 2015 00:50 IST2015-10-20T00:50:12+5:302015-10-20T00:50:35+5:30
फलटणला उत्स्फूर्त प्रतिसाद : आकर्षक वेशभूषेत नातीपासून आजीपर्यंत सर्वांनीच धरला ठेका

दांडियाच्या ठेक्यावर थिरकल्या सखी..!
फलटण : मराठी, हिंदी चित्रपटांतील विविध दिलखेचक गाण्यांच्या तालावर ‘रास दांडिया’चा खेळ रंगला गेला. उत्तरोत्तर खेळ अधिकच रंगात जाऊन मनसोक्त खेळाचा आनंद सखींनी लुटला.
‘लोकमत सखी मंच’ फलटणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे फलटणमधील सखी मंच सदस्या व इतर महिलांसाठी ‘रास दांडिया’ धमाल स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन राजलक्ष्मी लॉन्सवर करण्यात आले होते.
प्रारंभी ‘लोकमतचे’ संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित काही सखींच्या हस्ते दीपप्रज्वलनाद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मनाला भुरळ पाडणारे संगीताचे बिट्सवर सखींनी ताल धरला. विविध आकर्षक वेशभूषेत दांडिया खेळण्यासाठी सखी आल्या होत्या. नवरात्रीमध्ये प्रामुख्याने दांडिया खेळला जात असल्याने दरवर्षी नवरात्रीची वाट पाहिली जाते.
वर्षातून एकदाच खेळायला मिळत असल्याने हा खेळ खेळण्यासाठी व बघण्यासाठी सखींनी गर्दी केली होती. लहान मुलींपासून मोठ्या आजीपर्यंत सर्वांनी दांडिया गरबावर ठेका धरला. ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांवर मोठ्या उत्साहात धरला. (प्रतिनिधी) ‘सहेली’ ठरला बेस्ट ग्रुप
या स्पर्धेमध्ये बेस्ट ग्रुप म्हणून सहेली ग्रुप, बेस्ट वेशभूषा म्हणून तेजस्विनी घाटे, बेस्ट स्टेपपासून ईशा आणि दिया दोशी, दांडिया क्वीन म्हणून सिद्धी आहेरराव, बेस्ट प्लेअर म्हणून गोल्डी दोशी, खुशी कोठारिया यांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राजू देशपांडे, सुरेश पोतेकर यांनी काम पाहिले.