हुपरीत रंगला ‘सखी मंच’चा डान्स शो
By Admin | Updated: January 17, 2015 00:10 IST2015-01-16T22:17:58+5:302015-01-17T00:10:21+5:30
जल्लोषी वातावरण : नृत्याच्या तालावर थिरकली पावले, टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा नाद

हुपरीत रंगला ‘सखी मंच’चा डान्स शो
कोल्हापूर : विविध गितांच्या तालावर नृत्यासाठी लयबद्धपणे थिरकणारी पावले, टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा नाद, जोडीला महिलांची उत्स्फूर्त दाद, अशा जल्लोषी वातावरणात ‘लोकमत सखी मंच’च्यावतीने आयोजित ‘धमाल डान्स शो’ हुपरी येथील यशवंत मंगल कार्यालय, चांदीनगर येथे नुकताच संपन्न झाला. ‘सखी मंच’च्या हुपरी येथील सभासद कलाकारांनी एकपात्री प्रयोग, एकल नृत्य, फॅशन शो, समूह नृत्य, गायन अशा एकापेक्षा एक सरस कला सादर करून सखींची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते व असि. इव्हेंट मॅनेजर दीपक मनाठकर, नीलावती शेटे, विद्या जाधव, डॉ. प्राची घुणके यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी सहभागी कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘सखी मंच’च्या २०१५ सालच्या सभासद नोंदणीविषयक यावेळी माहिती देण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. राजराजेश्वरी काटकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संयोजन ‘सखी मंच’ संयोजन समिती सदस्या गीता बडवे यांनी केले.