शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हाजगोळी परिसरात हत्तीचा धुमाकूळ सुरूच, ऊस लवकर उचल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:08 IST

वनविभागाने ऊस उचलीसाठी प्रयत्न करावेत

चंदगड : गेल्या काही दिवसांपासून हाजगोळी, नगरगाव, धामणे परिसरात असलेल्या हत्तीने बुधवारी रात्री आपला मोर्चा जंगमहट्टी, कलिवडे भागात वळविला असून ऊस, भात व नाचणी पिकाचे मोठे नुकसान सुरू आहे. एकीकडे ऊस आंदोलन तर दुसरीकडे हत्तीकडून ऊस पिकाचा फडशा सुरू असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याने या परिसरातील ऊस उचल त्वरित करावी, अशी मागणी सरपंच अस्मिता कदम यांनी केली आहे.जंगमहट्टी धरण परिसरात हत्ती तळ ठोकून असून बुधवारी रात्री त्याने जोतिबा कदम, दत्तू भोगूलकर, देवानंद कदम, गुंडू गावडे, विठ्ठल पाटील, गोपाळ गावडे यांच्या ऊस, भात व नाचणी पिकाचे मोठे नुकसान केले आहे. ऊस आंदोलन व हत्ती उपद्रवामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून हतबल वनविभाग केवळ पंचनाम्यापलीकडे काही करत नाही. त्यामुळे या परिसरात उसाची उचल लवकर करण्यासाठी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी कारखान्यांना सूचना करावी, जेणेकरून अधिकचे नुकसान टाळता येईल, अशी मागणी सरपंच कदम यांनी त्यांच्याकडे केली आहे.वनविभागाने ऊस उचलीसाठी प्रयत्न करावेतऐन सुगी हंगामात हत्तीने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकरी घाईला आला असून वनविभागानेच पुढाकार घेऊन या भागातील ऊस उचल लवकर व्हावी, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अशोक कदम यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग