गडहिंग्लजला ग्रामपंचायत कामगारांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:28 IST2021-08-12T04:28:47+5:302021-08-12T04:28:47+5:30
१० ऑगस्ट,२०२० रोजी राज्याच्या कामगार विभागाने काढलेल्या सुधारित किमान वेतन अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. ...

गडहिंग्लजला ग्रामपंचायत कामगारांचे धरणे आंदोलन
१० ऑगस्ट,२०२० रोजी राज्याच्या कामगार विभागाने काढलेल्या सुधारित किमान वेतन अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकारी शरद मगर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यासंदर्भात चर्चेसाठी लवकरच बैठक बोलावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
कामगार नेते बाळेश नाईक म्हणाले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका अद्ययावत करणे, कोरोनाकाळातील प्रोत्साहन भत्ता व प्रॉव्हिडंड फंड आदी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.त्यासाठी संघटना पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक तातडीने बोलवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी कॉ. सम्राट मोरे, संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र कांबळे, उपाध्यक्ष दिलीप परीट यांचीही भाषणे झाली.
आंदोलनात कृष्णा कांबळे, जगन्नाथ चिंदके, रावजी कांबळे, सुरेश म्हंकावे,सुरेश मायन्नावर, सिद्धाप्पा करिगार, भाऊसाहेब देसाई, उत्तम गंधवाले, संतोष आजगेकर,केंपान्ना आलापगोळ, गजेंद्र कांबळे आदींसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
फोटो ओळी-
गडहिंग्लज पंचायत समितीसमोर ग्रामपंचायत कामगारांनी धरणे आंदोलन केले.यावेळी बाळेश नाईक यांनी मार्गदर्शन केले.( मजिद किल्लेदार)