शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation :विशेष अधिवेशनाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे शुक्रवारी धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 19:23 IST

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने केली. या मागणीसाठी  शुक्रवारी (दि. २८) सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.

ठळक मुद्देविशेष अधिवेशनाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे शुक्रवारी धरणे आंदोलन शिवाजी पेठेतील बैठकीत निर्णय : आमदार, खासदार यांनी छत्रपती शिवाजी चौकात यावे

 कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने तातडीने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने केली. या मागणीसाठी  शुक्रवारी (दि. २८) सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला.शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरामध्ये सकल मराठा समाजाची बैठक झाली. त्यात समाजबांधवांनी विविध सूचना, मते मांडली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तातडीने विशेष अधिवेशन राज्य सरकारने बोलवावे. त्याबाबत जिल्ह्यातील आमदार, खासदारांना निवेदन देण्यात येईल.

अधिवेशनाच्या मागणीसाठी उद्या सकाळी साडेनऊ ते साडेअकरा यावेळेत धरणे आंदोलन करण्यात येईल. त्यामध्ये मराठा बांधव हे काळ्या फिती लावून सहभागी होतील. सरकारने विशेष अधिवेशन घेतले नाही तर समाजाची बैठक घेऊन पुढील आंदोलन ठरविले जाईल, असे सुजित चव्हाण यांनी सांगितले.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजी-माजी आमदार, खासदार यांनी छत्रपती शिवाजी चौकात यावे, असे आवाहन महेश जाधव यांनी केले. आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सोयी-सुविधा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

सरकारने विशेष कायदा करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी निवासराव साळोखे यांनी केले. तज्ज्ञ वकिलांची परिषद घेऊन त्यांनी मांडलेल्या सूचना पुनर्विचार याचिकेमध्ये समाविष्ट कराव्यात, अशी सूचना ॲड. अशोकराव साळोखे यांनी केली. कायदेशीर टिकणाऱ्या आरक्षणासाठी लढा देणे आवश्यक आहे. आरक्षण मिळेपर्यंत सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचे जास्तीत जास्त लाभ द्यावेत, अशी मागणी बाबा इंदुलकर यांनी केली.

या बैठकीत दिलीप देसाई यांनी आरक्षण मिळेपर्यंत सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सवलती द्याव्यात. त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन राज्य सरकारने घ्यावे, या मागणीचा ठराव मांडला. तो उपस्थितांनी मान्य केला. यावेळी दिलीप पाटील, फत्तेसिंह सावंत, श्रीकांत भोसले, स्वप्निल पार्टे, दिलीप सावंत, संदीप मोहिते, राजेंद्र चव्हाण, मंजित माने, आदी उपस्थित होते. सुरेश जरग यांनी आभार मानले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर