दालमियाचा देशात १३.४३ अव्वल साखर उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:19+5:302021-07-03T04:16:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर कंपनी) साखर कारखान्याचा गत ...

दालमियाचा देशात १३.४३ अव्वल साखर उतारा
लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर कंपनी) साखर कारखान्याचा गत गळीत हंगामाचा साखर उतारा १३.४३ मिळाल्याने दत्त दालमिया साखर उताऱ्यात देशात अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे उसाला चांगला दर प्राप्त होणार आहे. पुढील गळीत हंगामात ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याची माहिती कंपनीचे युनिटहेड एन. सी. पालीवाल यांनी पत्रकार बैठकीत सांगितली.
दरम्यान कारखान्याच्या पुढील गळीत हंगामासाठीच्या मील रोलरचे पूजन युनिटहेड एन. सी. पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीत त्यांनी कारखान्याशी निगडित असणाऱ्या सहवीज प्रकल्प आणि डिस्टलरी प्रकल्पाचा आढावा घेतला.
कारखान्याने गत गळीत हंगामात ११ लाख मेट्रिक टनाचे उच्चांकी गाळप करून साखर उद्योगात १३.४३ उच्चांकी साखर उतारा मिळवला आहे. दालमिया नेहमीच शेतकऱ्यांना वेळेत आणि चांगला दर देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याने त्याचेच फलित आहे. कारखान्यातील उसाच्या रसापासून इथेनाॅल निर्मितीला परवानगी मिळाली आहे. इथेनाॅल प्रकल्प त्वरित सुरू करण्याच्या दृष्टीने कामकाजात गती असून गळीत हंगामाच्या दरम्यान प्रकल्प सुरू करण्याचा मानस कंपनीचा आहे. कंपनीने कारखान्यातील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंध लस मोफत दिली असून कर्मचाऱ्यांना लसीची सक्ती केली आहे. लस नाही तर काम काम नाही, अशी मोहीम कंपनीने कोरोना लसीबाबत राबवली आहे. याप्रसंगी कारखान्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.