डॉल्बीला आता पोलिसांचा ‘ठोका’
By Admin | Updated: July 23, 2015 00:32 IST2015-07-23T00:26:11+5:302015-07-23T00:32:14+5:30
कारवाईचा इशारा : १०० क्रमांकावर किंवा आॅनलाईन तक्रार द्यावी

डॉल्बीला आता पोलिसांचा ‘ठोका’
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये ध्वनिक्षेपकाचा (डॉल्बी) मोठ्या प्रमाणात वापर होत असून, त्याचा सर्वसामान्य जनतेला त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. ध्वनिक्षेपकाचा आवाज नियंत्रणात ठेवावा, अन्यथा चालक व मालक यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी बुधवारी दिला.
नागरिकांना डॉल्बीच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी कठोर पाऊल उचलले आहे. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावल्यास चालक व मालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी ध्वनिप्रदूषणाबाबतच्या तक्रारी नोंदवून सहकार्याचे आवाहन डॉ. शर्मा यांनी केले. त्यासाठी पोलीस अधीक्षक येथील नियंत्रण कक्ष, १०० नंबरवर तक्रारी द्याव्यात तसेच २स्र.‘ङ्म’ँंस्र४१@ेंँंस्रङ्म’्रूी.ॅङ्म५.्रल्ल या ई-मेलद्वारे सुद्धा तक्रारी द्याव्यात. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. जवळच्या पोलीस ठाण्यातही तक्रार देऊ शकतात. दाखल होणाऱ्या तक्रारीची दखल तत्काळ घेऊन पोलीस यंत्रणा घटनास्थळी जावून ध्वनिमापकाच्या सहायाने ध्वनीची तीव्रता मोजेल. जर तीव्रता २००० मधील तरतुदीपेक्षा जास्त असल्यास चालक व मालकांवर जाग्यावर कारवाई करणार आहेत.