शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2023: नवमीला दक्षिणामूर्ती अंबाबाई; उद्या शाही दसरा सोहळा, सिमोल्लंघनाची तयारी पूर्ण

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 23, 2023 17:35 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात नवमीनिमित्त सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची दक्षिणामूर्ती देवतेच्या रुपात पूजा बांधण्यात आली. आज मंगळवारी ऐतिहासिक दसरा ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात नवमीनिमित्त सोमवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची दक्षिणामूर्ती देवतेच्या रुपात पूजा बांधण्यात आली. आज मंगळवारी ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा होणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.रविवारी अष्टमीचा जागर झाल्याने सोमवारी सकाळी अंबाबाईचे मंदिर उशीरा उघडले. त्यानंतर देवीचा अभिषेक व दुपारची आरती झाल्यानंतर सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्रीदक्षिणामूर्ती हे भगवान शिवांचे साकार, ज्ञानस्वरूप रूप आहे. सर्व आगमशास्त्रे तंत्रविद्यांमध्ये श्रीदक्षिणामूर्ती हे आदिगुरू- संप्रदाय प्रवर्तक आहेत. यांच्या उपासनेने सर्व विद्या, रोग- निवारण, मोक्षप्राप्ती होते. मृत्युचक्र नष्ट करणारी देवता म्हणून यांचे मुख दक्षिण दिशेला असते. श्रीदक्षिणामूर्ती हे वटवृक्षाखाली ध्यानमग्न असून चतुर्भुज आहेत. ज्ञान हे निरंतर चिरतरुण असते, म्हणून ज्ञानमय दक्षिणामूर्ती नित्य तरुण असतात, तर ज्ञान घेणारा विद्यार्थी ‘वृद्ध’ होतो; 'वृद्धाः शिष्याः'। म्हणून त्यांच्या सभोवती ज्ञानार्थी वृद्ध असतात.भगवान दक्षिणामूर्ती आपल्या शिष्यांना मौनाने उपदेश करीत असून, त्यातूनच शिष्यांच्या सर्व शंकांचे समाधान होत आहे. आद्य शंकराचार्यांचे श्रीदक्षिणामूर्ति स्तोत्र सुप्रसिद्ध आहे. श्रीदेवी माता ही आदिशक्ती असून सर्व सृष्टी, विद्या कला- अध्यात्माची जननी आहे; म्हणून ज्ञानरूपा श्रीदेवी मातेतील दक्षिणामूर्ती देवता तत्त्वाचे दर्शन घडवणारी महापूजा श्रीपूजक सचिन ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे.

उद्या, सायंकाळी ६ वाजता शाही दसरा सोहळाकोल्हापूरचा शाही दसरा सोहळा उद्या, मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ऐतिहासिक दसरा चौकात होणार आहे. राज्य शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने यंदा सोहळ्याची भव्यता वाढली आहे. या सोहळ्यासाठी अंबाबाई व तुळजाभवानीची पालखी दसरा चौकात येईल. शाहू छत्रपती यांचे मेबॅक कारमधून आगमन होईल. देवीची आरती व शमीपूजन झाल्यानंतर सीमोल्लंघन सोहळा होईल. त्यानंतर अंबाबाईची पालखी सिद्धार्थ नगर मार्गे मंदिरात परत येईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्री