शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी खुली, दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटनस्थळे गजबजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 15:28 IST

राधानगरी : दाजीपूर जंगल सफारी आज, शुक्रवार (दि.२४) पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोबर ...

राधानगरी : दाजीपूर जंगल सफारी आज, शुक्रवार (दि.२४) पासून पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. दरवर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाळ्यामुळे अभयारण्य बंद ठेवण्यात येते. यंदा मात्र १४ मे पासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे १५ मे पासूनच प्रवेश बंद करण्यात आला होता. दिवाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढल्याने अखेर जंगल सफारी सुरु करण्यात आली.दिवाळी सुट्ट्यांमुळे जिल्ह्यात पर्यटनस्थळे गजबजून गेली आहेत. अशातच गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एकमेव दाजीपूर (राधानगरी) अभयारण्य सफारीसाठी बंद असल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. गोकुळ संचालक अभिजीत तायशेटे यांनी जंगल सफारी तात्काळ सुरु करावी अशा मागणीचे निवेदन वनविभागाला दिले.याची दखल घेत सध्या पावसाळी वातावरण असल्याने पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन सद्यस्थिती वाहन जिथे जाते तिथं पर्यत जंगल सफारी सुरु राहणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Dajipur Jungle Safari Reopens for Tourists Amid Diwali Holiday Rush

Web Summary : Dajipur jungle safari in Radhanagari reopens after being closed due to monsoon. The reopening comes amidst Diwali holidays, leading to increased tourist activity. The forest department has initiated the safari to accommodate tourist demand, allowing vehicles up to accessible points. Locals had expressed discontent over the closure.