डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये महिला दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:47+5:302021-03-09T04:26:47+5:30
महिला दिनानिमित्त हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांनी फ्लॅश मॉबने रंगत आणली. रंग दे बसंती व ...

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये महिला दिन उत्साहात
महिला दिनानिमित्त हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांनी फ्लॅश मॉबने रंगत आणली. रंग दे बसंती व उडी उडी जाय या गीतावर उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर आयोजित ‘फ़ेलिसिएटीग द वूमनहूड’ या कार्यक्रमात कोविड काळात योगदान देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यता आला. महिला दिनानिमित्त सोमवारी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग विभागाच्या वतीने महिलांसाठी पॅप स्मियर (गर्भाशय मुखाची तपासणी), कोल्पोस्कोपी (गर्भाशय पिशवीची दुर्बिणीद्वारे तपासणी), स्तन परीक्षण व प्रसूतीपूर्व या चार तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील, डॉ. नीलिमा शहा, डॉ. संगीता देसाई, डॉ. वसुधा सावंत, डॉ. कल्पना कुलकर्णी, डॉ. अनिता अडनाईक उपस्थित होत्या.