डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या तळसंदे येथील डी. वाय. पाटील ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाने ''''बिझनेस साईट'''' या ख्यातनाम नियतकालिकाच्या ‘‘टॉप १०’’ संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना याबाबतचे प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले आहे. ‘‘बिझनेस साईट’’ या राष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकाने ‘‘टॉप १० कंपनीज बियॉन्ड कोविड १९ इम्पॅक्ट’’मध्ये तळसंदे येथील डी. वाय. पाटील ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाचा समावेश केला आहे.
अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली डी. वाय. पाटील ॲग्रीकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात कोविड काळात विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबवले. तसेच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण शिक्षण विनाखंड मिळावे यासाठी ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देण्यात आली. महाविद्यालयाची वेगवान व गुणात्मक प्रगती, व्यवसाय पद्धती, व्यावसायिक समर्पण व शैक्षणिक सुविधा, आदींची दाखल घेऊन बिझनेस साईटने "टॉप १० कंपनीज बियॉन्ड कोविड १९ इम्पॅक्ट’’मध्ये या महाविद्यालयाचा समावेश केला आहे. महविद्यालायाच्या यशामध्ये कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्रा. प्रवीण उके, प्रा. अमोल गाताडे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्गाचे मोठे योगदान आहे. ‘‘दि नॉलेज रिव्ह्यू’’ नियतकालिकाने याचवर्षी ‘‘देशातील सर्वोत्तम १० कृषी संस्था’’मध्ये या महाविद्यालयाला स्थान दिले आहे.