डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या साकिब मुल्लाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:34+5:302021-01-08T05:16:34+5:30

या स्पर्धेसाठी साकिब मुल्ला याने ''''सेलिब्रेटिंग व्हाईड - द ॲडॅपटीव्ह रीयुज ऑफ क्वॉरी'''' या ...

D. Y. Shakib Mulla's success in international competition of Patil Architecture | डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या साकिब मुल्लाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश

डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या साकिब मुल्लाचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश

या स्पर्धेसाठी साकिब मुल्ला याने ''''सेलिब्रेटिंग व्हाईड - द ॲडॅपटीव्ह रीयुज ऑफ क्वॉरी'''' या विषयावर प्रोजेक्ट केला होता. यामध्ये पहिल्या फेजमध्ये क्वॉरी पार्क, फूड प्लाझा, बोटिंग आणि पर्यटन केंद्र, दुसऱ्या फेजमध्ये रिसॉर्ट, हॉटेल आणि तिसऱ्या फेजमध्ये इन्व्हेन्शन हॉल आणि ऑफिस प्रस्तावित केले आहेत.

इटली येथील बहुराष्ट्रीय मँगो आर्किटेक्चर कंपनीकडून दरवर्षी लाईव्ह प्रोजेक्टवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. विविध देशांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. त्यामध्ये डी. वाय. पाटील महाविद्यालय आर्किटेक्चर विभागातील विद्यार्थी साकिब मुल्ला याने १० हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक पटकावले.

साकिबने मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, आर्किटेक्चर विभागाचे डीन प्रा. आर. जी. सावंत, विभाग प्रमुख प्रा. आय. एस. जाधव यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Web Title: D. Y. Shakib Mulla's success in international competition of Patil Architecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.