डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांची रिलायन्स रिटेलमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:45+5:302021-07-19T04:16:45+5:30
येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या बी. ई. मेकॅनिकल विभागातील ४ विद्यार्थ्यांची ‘रिलायन्स रिटेल’ ...

डी. वाय. पाटील इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांची रिलायन्स रिटेलमध्ये निवड
येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या बी. ई. मेकॅनिकल विभागातील ४ विद्यार्थ्यांची ‘रिलायन्स रिटेल’ कंपनीमध्ये निवड झाली आहे. कंपनीतर्फे झालेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे ही निवड केली.
महाविद्यालयाच्या बी. ई. मेकॅनिकलच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या अर्जुन पवार, निखिल पाटील, प्रथमेश जोशी व राहुल मुत्तनवार या चौघांची रिलायन्स रिटेलमध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी या पदावर निवड झाली आहे. तर ओमकार यादव याची आरडीसी काँक्रिटमध्ये निवड झाली आहे.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता डॉ. क्षमा कुळहळळी, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. सुनील रायकर, कॉप्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा. बी. डी. जितकर, टिपीओ प्रा. सुदर्शन सुतार आदींनी अभिनंदन केले आहे.