डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:52+5:302021-01-08T05:16:52+5:30

विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची महती सांगताना शिक्षण हेच प्रगतीचे माध्यम असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. अंजली ...

D. Y. Savitribai Phule Jayanti at Patil Abhimat University | डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती

विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची महती सांगताना शिक्षण हेच प्रगतीचे माध्यम असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. अंजली वाघ, मनीषा टाकळकर, प्रा. डॉ. सुनीता पाटील, प्रा. डॉ. अमृता कुंभार, सरिता चौधरी, श्रीया पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला डीन डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी, एचआर अँड ॲडमिन हेड श्रीलेखा साटम, उपकुलसचिव संजय जाधव, सुरेश खोपडे, विभागप्रमुख डॉ. ढवळशंख, डॉ. निकम, डॉ. उमा चौगुले, मेडिकल कॉलेजच्या प्राचार्य डॉ. आशालता पाटील, सीआयआर विभाग प्रा. डॉ. अर्पिता तिवारी व डॉ. अश्विनी जाधव, विद्यापीठाच्या श्वेता आंबीलढोक, डीन कार्यालयाच्या हेडक्लार्क वृषाली महाजनी यांच्यासह सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या. सेंट्रल लायब्ररियन बी. एस. पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

फोटो: ०६ डी.वाय. पाटील सावित्रीबाई फुले जयंती

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, सीएचआरओ श्रीलेखा साटम यांच्यासह विविध विभागप्रमुख व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

Web Title: D. Y. Savitribai Phule Jayanti at Patil Abhimat University