‘डी. वाय. पी विद्यानिकेतन’ने घरफाळा चुकविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:23+5:302021-03-26T04:23:23+5:30
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील विद्यानिकेतनच्या इमारतीचा घरफाळा भरला नसल्याचा आरोप माजी महापौर ...

‘डी. वाय. पी विद्यानिकेतन’ने घरफाळा चुकविला
कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील विद्यानिकेतनच्या इमारतीचा घरफाळा भरला नसल्याचा आरोप माजी महापौर सुनील कदम व माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी गुरुवारी केला.
साळोखे नगर येथील डी. वाय. पाटील विद्यानिकेतन येथे २०१४ पासून अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू आहे. दीड लाख स्क्वेअर फुटाचे बांधकाम झाले असून जेथे ही इमारत बांधली आहे, त्या जागेवर महापालिकेचे प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे. या इमारतीचा घरफाळा भरला आहे का अशी माहिती आपण माहितीच्या अधिकारात बुधवारी मागितली होती. तेव्हा प्रशासनाने या मिळकतीला कर आकारणी करण्यासंदर्भात मागणी आली असून मिळकतीला कर आकारणीची प्रक्रिया सुरू आहे. आकारणी अंतिम झाल्यावर आपणास कळविण्यात येईल, असे पत्र महापालिका उपायुक्तांनी आपणास दिले आहे. याचा अर्थ संस्थेने गेल्या सहा वर्षांत घरफाळा भरलेला नाही.’
अधिकाऱ्यांना दमदाटी करून आपल्या इमारतींचा घरफाळा चुकविणे हा महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा असल्याचा आरोप कदम बंधू यांनी केला. महापालिकेचा घरफाळा चुकविण्याची आणखी दोन प्रकरणे उजेडात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.