डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा कोल्हापूर कॅन्सर सेंटरशी सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:41+5:302021-01-08T05:16:41+5:30
या करारानुसार विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसीप्लेनरीमधील मेडिकल फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना केसीसीच्या तज्ज्ञ डॉक्टरकडून रेडिओथेरपी युनिटमध्ये यंत्र हाताळणीसह विविध गोष्टींचे ...

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा कोल्हापूर कॅन्सर सेंटरशी सामंजस्य करार
या करारानुसार विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर डिसीप्लेनरीमधील मेडिकल फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना केसीसीच्या तज्ज्ञ डॉक्टरकडून रेडिओथेरपी युनिटमध्ये यंत्र हाताळणीसह विविध गोष्टींचे प्रशिक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर रिसर्च प्रोजेक्टसाठी साहाय्य मिळणार आहे. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज व मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही निरीक्षण व प्रायोगिक शिक्षणाची संधी मिळणार आहे. विद्यापीठ आपल्या आवश्यकतेनुसार केसीसीमधील अनुभवी डॉक्टर्स व रेडिओलॉजीस्टची मानद फॅकल्टी म्हणून नियुक्ती करणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट तयार करण्यासह लेखी व प्रात्यक्षिक कामाबाबत प्रशिक्षण मिळणार आहे. यासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या सामंजस्य करारावर डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू प्रा. राकेश कुमार मुदगल, तर कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्यावतीने कार्यकारी संचालक डॉ. रेश्मा एस. पवार यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे, वार परीक्षा नियंत्रक अरुण पोवार आदी उपस्थित होते.
फोटो: डीवाय पाटील अभिमत विद्यापीठ
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ व कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. या करारावर विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू प्रा. राकेश कुमार मुदगल, तर कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्यावतीने कार्यकारी संचालक डॉ. रेश्मा एस. पवार यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, वित्त अधिकारी श्रीधर नारायण स्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, संशोधन संचालक डॉ. सी. डी. लोखंडे, वार परीक्षा नियंत्रक अरुण पोवार आदी उपस्थित होते.