डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मशीन लर्निंग कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST2021-05-07T04:23:44+5:302021-05-07T04:23:44+5:30
राजविमल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संतोष गायकवाड यांनी यावेळी ‘मशीन लर्निंग’साठी लागणाऱ्या तंत्रसामग्रीची प्रात्यक्षिकांसह ओळख करून दिली. ...

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मशीन लर्निंग कार्यशाळा
राजविमल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संतोष गायकवाड यांनी यावेळी ‘मशीन लर्निंग’साठी लागणाऱ्या तंत्रसामग्रीची प्रात्यक्षिकांसह ओळख करून दिली. संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या की, येणारा काळ हा संपूर्णपणे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग’चा असणार आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही आहेत. ही गरज ओळखून डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाने चालू शैक्षणिक वर्षांपासून ही स्वतंत्र शाखा सुरू केली आहे.
सदर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रियांका मोरे, प्रा. सोनाली सुर्वे, प्रा. मोनिका जगताप, प्रा. विनित शेवडे, प्रा. सोनाली शिंगे यांनी विशेष मेहनत घेतली.