डी. सी. नरके यांची उद्या पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST2021-02-16T04:25:47+5:302021-02-16T04:25:47+5:30

कोपार्डे : कुंभी-कासारी कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. डी. सी. नरके यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी (दि. १७) ...

D. C. Tomorrow is hell's death anniversary | डी. सी. नरके यांची उद्या पुण्यतिथी

डी. सी. नरके यांची उद्या पुण्यतिथी

कोपार्डे : कुंभी-कासारी कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. डी. सी. नरके यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी (दि. १७) सकाळी ९ वाजता स्व. डी. सी. नरके पुतळा पूजन व पुष्पहार अर्पण माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच कुंभी-कासारी साखर कामगार कल्याण मंडळ यांच्यावतीने सकाळी दहा वाजता कारखाना दवाखान्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. दरवर्षी आयोजित केली जाणारी अर्धमॅरेथॉन स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यावेळी उपाध्यक्ष निवास वातकर, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक अशोक पाटील, सेक्रेटरी प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: D. C. Tomorrow is hell's death anniversary