शिरोळ येथे काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST2021-07-14T04:29:26+5:302021-07-14T04:29:26+5:30
शिरोळ : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. ही ...

शिरोळ येथे काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली
शिरोळ : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. ही दरवाढ कमी करून सर्वसामान्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी शिरोळ तालुका काँग्रेसच्यावतीने मंगळवारी शिरोळ येथे सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीचे नेतृत्व काँग्रेसेचे नेते उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी केले.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. गॅसच्याही दरात वाढ झाली आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही महागल्या आहेत. कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे. केंद्राने इंधन आणि गॅसचे दर कमी करून दिलासा देण्याची गरज आहे.
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या महागाई विरुद्धचा लढा सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सायकल रॅली शिरोळ येथे काढण्यात आली.
रॅलीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, अशोक कोळेकर, शेखर पाटील, दरगू गावडे, महेंद्र बागे, किसान मोर्चा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित पाटील, श्रीकांत लंबे, अमोल चौगुले, अनंत धनवडे, मुसा डांगे, संजय पाटील-कोथळीकर, विठ्ठल पाटील, योगेश पुजारी, तातोबा पाटील, संदीप पवार, युनूस जमादार, बाळासो बणगे, शंकर कांबळे सहभागी झाले होते. तसेच महिला काँग्रेस समितीच्यावतीने तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पं. स. सदस्या मिनाज जमादार, अश्विनी चौगुले, अर्चना चौगुले यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
फोटो - १३०७२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - शिरोळ येथे काँग्रेसच्यावतीने सायकल रॅली काढण्यात आली. या वेळी गणपतराव पाटील, अशोकराव कोळेकर, विठ्ठल पाटील, योगेश पुजारी, रणजितसिंह पाटील, तातोबा पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.