२६/११चा कट पाकिस्तानातूनच

By Admin | Updated: March 15, 2015 00:45 IST2015-03-15T00:27:28+5:302015-03-15T00:45:16+5:30

उज्ज्वल निकम : जामीन राखता आला नाही

The cut of 26/11 is from Pakistan | २६/११चा कट पाकिस्तानातूनच

२६/११चा कट पाकिस्तानातूनच

वारणानगर : मुंबई येथे झालेल्या २६/११ हल्ल्यातील कट पाकिस्तानातील कराची येथे झकीर रेहमान लख्वी, अबू झिंदाल यांनी रचला होता. हे पुराव्यासह पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांना चर्चेत सांगितले होते. मात्र, पाकच्या भूमीवर कट रचूनदेखील त्यांना या कटाचे मुख्य आरोपी केले नाही. त्यांना जामीन मिळाल्यावर जामिनास न्यायालयात स्थगिती मिळण्यासाठी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे यांना न्यायालयाने दिलेला जामीन रोखता आला नाही, अशी खंत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
निकम आज, शनिवारी वारणानगर येथे आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मर्शद आलमसारख्या गुन्हेगाराची पुराव्याअभावी सुटका करण्याचा आदेश मंजूर करणे चुकीचे आहे. यामुळे दहशतवादाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. शासनाने उचललेले हे पाऊल चुकीचे आहे.
याप्रसंगी वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य जॉन डिसुझा, प्राचार्य एस. व्ही. आणेकर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: The cut of 26/11 is from Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.