शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

घरगुती गॅस ग्राहकांना १०० चा करंट, पंधरवड्यात आणखी ५० वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 12:18 IST

Cylinder, collector, kolhapur घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना कंपन्यांनी चालू महिन्यात १५ दिवसांच्या अंतराने शंभरचा करंट दिला आहे. एकाच महिन्यात १०० रुपयांनी गॅस महागल्याने किचन बजेटवर ताण पडला आहे. त्यातच खात्यावर येणारे अनुदानही बंद असल्याने कोल्हापुरात आता १४.२ किलोंच्या सिलिंडर्ससाठी ७०७ ते ७२१ रुपये मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देघरगुती गॅस ग्राहकांना १०० चा करंट, पंधरवड्यात आणखी ५० वाढलेप्रती सिलिंडरचा दर ७०७ ते ७२१ रुपयांवर

कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना कंपन्यांनी चालू महिन्यात १५ दिवसांच्या अंतराने शंभरचा करंट दिला आहे. एकाच महिन्यात १०० रुपयांनी गॅस महागल्याने किचन बजेटवर ताण पडला आहे. त्यातच खात्यावर येणारे अनुदानही बंद असल्याने कोल्हापुरात आता १४.२ किलोंच्या सिलिंडर्ससाठी ७०७ ते ७२१ रुपये मोजावे लागणार आहेत.इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून मंगळवारी हे दर जाहीर केले आहेत. दर १५ दिवसांनी हे दर जाहीर होतात. या महिन्याच्या एक तारखेला ५० रुपये वाढ झाली होती, १५ दिवसांच्या अंतरात आणखी ५० रुपये वाढवले गेले आहेत. एकूण वाढ १०० रुपये झाली आहे.जुलैनंतर पहिल्यांदाच गॅसच्या दरात वाढ झाली आहे. मागील वाढ जूनमध्ये झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरअखेरपर्यंत एक रुपयाचीदेखील वाढ झालेली नव्हती. पाच महिन्यांच्या विरामानंतर दोन टप्प्यात १०० रुपयांची मोठी वाढ झाली आहे.एप्रिलमध्ये सर्वाधिक ७२९ दर होता, त्यात मेमध्ये १३८ रुपयांची कपात होऊन ते ५९१ वर आले. त्यानंतर जूनमध्ये १० रुपयांची वाढ झाली. जुलैमध्ये किरकोळ चार रुपयांची वाढ होऊन तो दर ६०६ रुपये झाला. १ डिसेंबरला ५० रुपयांची वाढ होऊन हा दर ६५७ वर गेला. मंगळवारी आणखी ५० रुपयांची त्यात भर पडल्याने ही वाढ ७०७ वर पोहेचली आहे. वाहतूक व इतर खर्चासह प्रती सिलिंडरची किंमत ७२१ वर जाणार आहे.अनुदानावरून संभ्रमगॅस अनुदान थेट खात्यात जमा होत होते; पण मे महिन्यापासून ते येणे बंदच झाले आहे. सिलिंडरचा दर ६०० रुपयांपर्यंत खाली आल्याने हा निर्णय घेतला असल्याचे सरकार व कंपनीकडून सांगण्यात येत होते; पण आता दर पुन्हा वाढल्यानंतरही गेल्या १५ दिवसांत याबाबत कोणताच आदेश आलेला नाही. सरकारकडूनच आदेश नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. अनुदानाअभावी ग्राहकांना वाढीव दराने गॅसची झळ सोसावी लागत आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी