शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्वातीताई कोणता झेंडा हाती घेणार?; 'गडहिंग्लज'सह कोल्हापूर जिल्ह्याला उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 13:05 IST

चंदगड / कागलची उमेदवारी ?

राम मगदूम गडहिंग्लज (कोल्हापूर) : जनता दलाचे दिवंगत ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या प्रा.स्वाती कोरी यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत गडहिंग्लजसह जिल्ह्यालाही कमालीची उत्सुकता आहे. सद्यस्थितीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे दोन्ही पर्याय त्यांच्यासमोर आहेत. परंतु, वडीलांच्याप्रमाणेच त्या जनता दलाचाच झेंडा खांद्यावर मिरवणार की देश/ राज्यपातळीवरील समविचारी 'नवा पर्याय'निवडणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.गडहिंग्लज शहरात जनता दलाचा दबदबा असून तालुक्यातील गावोगावी निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.शिंदेंनी दोनवेळा गडहिंग्लजची आमदारकी,२५ वर्षे गडहिंग्लज साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषवले. तसेच अपवाद वगळता तब्बल ४० वर्षे गडहिंग्लज नगरपालिकेवरही त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. शरद पवार आणि श्रीपतराव शिंदे यांचे ऋणानुबंध सर्वश्रृत आहेत. प्रसंगी स्वकीयांचा विरोध पत्करून पवारांनी शिंदेंना कारखान्यासाठी मदत केली होती.त्यामुळे राजकीय मतभेद असले तरी दोघांतील ‘मैत्री’ अखेरपर्यंत कायम राहिली. त्यामुळे खुद्द पवारांनीच हाक दिली तर स्वातीतार्इंना ‘ना’ म्हणता येणार नाही.दुसऱ्या बाजूला मोदींच्या विरोधात राहूल गांधी यांनी उघडलेली मोहिम,त्याला देशभरात डाव्यांकडून मिळणारा प्रतिसाद आणि जिल्हा पातळीवर माजी मंत्री सतेज पाटील व शिंदे कुटुंबियांतील जिव्हाळ्याचे संबंध विचारात घेता सतेज पाटील यांच्याकडूनही स्वातीतार्इंना सोबत घेण्याचे प्रयत्न नाकारता येत नाही.

चंदगड / कागलची उमेदवारी ?काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 'कागल' आणि 'चंदगड' दोन्ही मतदारसंघात सध्या प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांना रोखण्याकरिता 'कागल'साठी तर आमदार राजेश पाटील यांना रोखण्यासाठी 'चंदगड'साठी स्वातीताईंचे नाव पुढे येऊ शकते.

स्वातीताईंची जमेची बाजू !स्वातीताईंनी शोकसभेतच श्रीपतराव शिंदेंच्या संघर्षाचा आणि विचाराचा वसा पुढे चालविण्याची ग्वाही दिल्यामुळे  शिंदेंच्या चाहत्यांचे पाठबळ त्यांना आपसूकच मिळाले आहे.त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व आणि संघटन कौशल्यही असून त्यांनी दोनवेळा नगराध्यक्षपद समर्थपणे सांभाळले आहे.तसेच एकदा चंदगड विधानसभेची निवडणूकही लढवली आहे.

'जनसुराज्य'कडूनही संधी !स्वातीताई भाजपमध्ये जाणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी 'जनसुराज्य'च्या तिकिटावर निवडणूक लढवावी,असे प्रयत्न होवू शकतात.यापूर्वी गडहिंग्लज नगरपालिका व कारखान्यात ज.द-जनसुराज्य आघाडीची सत्ता होती.तव्दत, जनता दलाने आपल्यासोबत यावे असा मुश्रीफ यांचाही प्रयत्न आहे.

दिगज्जांकडून 'धीर' !शरद पवार यांनी भ्रमणध्वनीवरून तर पालकमंत्री मुश्रीफ, उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री विनय कोरे  व सतेज पाटील आदींनी सांत्वनाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटून शिंदे कुटुंबियांना 'धीर' दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण