शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चांगुलपणाच्या संस्काराचे अनुकरण व्हावे : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 18:44 IST

CoronaVirus Kolhapur Bjp : ज्यातून कसे सुटायचे हे माहिती नसणारे कोरोनाचे संकट जगावर आले. या काळात कोल्हापुरात अनेक व्यक्ती आणि संस्थांनी चांगुलपणाचा संस्कार काय असतो हे दाखवून दिले. त्यांच्यावरील या संस्काराचे अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. ​​​​​​​

ठळक मुद्देचांगुलपणाच्या संस्काराचे अनुकरण व्हावे : चंद्रकांत पाटील कोरोना काळातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

कोल्हापूर : ज्यातून कसे सुटायचे हे माहिती नसणारे कोरोनाचे संकट जगावर आले. या काळात कोल्हापुरात अनेक व्यक्ती आणि संस्थांनी चांगुलपणाचा संस्कार काय असतो हे दाखवून दिले. त्यांच्यावरील या संस्काराचे अनुकरण व्हावे, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.अभिमान कोल्हापूरचा अभियानांतर्गत गायन समाज देवल क्लब येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. कोरोनाकाळात शहरातील विविध संस्था, संघटना, व्यक्ती यांनी विविध प्रकारचे सामाजिक कार्य केले. अशांविषयी या वेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भाजपच्यावतीने कृतज्ञता पत्र आणि सन्माचिन्ह देऊन या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून त्यांच्या कार्यावरही प्रकाशझोत टाकण्यात आला. महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी प्रास्ताविक केले. भाजपची या उपक्रमामागील भूमिका विशद केली. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांच्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली. ते म्हणाले, समाजच समाजासाठी कसे काम करतो हे या काळात पहावयास मिळाले. या सर्वांपासून प्रेरणा घेऊन आणखी कार्यकर्ते तयार व्हावेत आणि समाजातील दीन-दुबळ्यांना त्यांची मदत व्हावी, हीच या कार्यक्रमातून अपेक्षा आहे.

या वेळी जाफरबाबा, प्रिया दंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रा. जयंत पाटील, सुहास लटोरे, महेश जाधव, दिलीप मैत्राणी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते....यांचा झाला सन्मानमिलिंद धोंड, जयेश ओसवाल, उमेश यादव, प्रिया दंडगे, शुभांगी थोरात, हर्षल सुर्वे, प्रिया पाटील (भवानी फाउंडेशन), विराज सरनाईक (कर्तृत्व सामाजिक संस्था), अशोक देसाई (हिंदू युवा प्रतिष्ठान), अशोक रोकडे (व्हाईट आर्मी), ऐश्वर्या मुनिश्वर (सेवा निलायम), संताजी घोरपडे, डॉ. संगीता निंबाळकर, राजू मेवेकरी (महालक्ष्मी अन्नछत्र), अवधूत भाट्ये (द नेशन फस्ट), रवी जावळे (माणुसकी फाउंडेशन), संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे (सेवाव्रत प्रतिष्ठान), हिल रायडर्स (प्रमोद पाटील), जाफरबाबा (बैतुलमाल कमिटी), रॉबिनहूड आर्मी, पोलीस कर्मचारी भगवान गिरीगोसावी, निवास पाटील, अनंत खासबारदार, शिरीष खांडेकर, चारुदत्त जोशी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर