३00 एकर क्षेत्रातील पिके करपू लागली
By Admin | Updated: May 13, 2017 00:55 IST2017-05-13T00:55:03+5:302017-05-13T00:55:03+5:30
३00 एकर क्षेत्रातील पिके करपू लागली

३00 एकर क्षेत्रातील पिके करपू लागली
लोकमत न्यूज नेटवर्क
हुपरी : तळंदगे (ता. हातकणंगले) येथील आठ दिवसांपूर्वी जळालेल्या विद्युत ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती करण्यास महावितरणकडून दिरंगाई होत
आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यामध्ये शेतीला वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने सुमारे ३00 एकर क्षेत्रातील उभी पिके करपू लागली आहेत. याप्रश्नी संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या हुपरी उपविभागीय कार्यालयाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता महावितरणकडे ट्रान्स्फॉर्मरच शिल्लक नसल्याचे उत्तर देऊन परत पाठविण्यात येत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकल्याने याप्रश्नी आता कुणाकडे दाद मागायची? या विवंचनेने शेतकरी वैतागून गेला
आहे.
तळंदगे येथील शिरोळे परिसरातील शेतीसाठी पाणीपुरवठा करणे सोईस्कर व्हावे यासाठी उभारण्यात आलेला विद्युत ट्रान्स्फॉर्मर आठ दिवसांपूर्वी जळाला आहे. त्यावेळेपासून शेती विभागाचा विद्युतपुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे.
याबाबत महावितरणचे उपअभियंता धुळुगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महावितरणकडे पर्यायी ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध नसल्याने अद्यापपर्यंत त्या परिसरातील शेतीचा विद्युतपुरवठा गेल्या सात-आठ दिवसांपासून
बंद आहे. येत्या दोन-तीन
दिवसांत महावितरणकडून ट्रान्स्फॉर्मर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर परिसरातील शेतीचा विद्युतपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल.