शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

मामाच्या गावी सुट्टीला आलेल्या कबनूरच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 18:41 IST

सुट्टीत मामाच्या गावी आलेल्या चिमुकलीचा शिंगणापूर बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. अंजली ऊर्फ अमृता बाळासाहेब चव्हाण (वय ९, रा. इंदिरानगर, कबनूर, ता. हातकणंगले) असे त्या मृत चिमुकलीचे नाव आहे. ती दीड महिन्यापूर्वी आपटेनगर येथे आजोळी आली होती.

ठळक मुद्देमामाच्या गावी सुट्टीला आलेल्या कबनूरच्या चिमुकलीचा बुडून मृत्यूकोल्हापुरात शिंगणापूर बंधाऱ्यात दुर्घटना

कोल्हापूर : सुट्टीत मामाच्या गावी आलेल्या चिमुकलीचा शिंगणापूर बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. अंजली ऊर्फ अमृता बाळासाहेब चव्हाण (वय ९, रा. इंदिरानगर, कबनूर, ता. हातकणंगले) असे त्या मृत चिमुकलीचे नाव आहे. ती दीड महिन्यापूर्वी आपटेनगर येथे आजोळी आली होती.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंजली ऊर्फ अमृता ही कबनूरमध्ये इयत्ता तिसरी उत्तीर्ण झाली आहे. शाळेला सुट्टी पडल्याने ती कोल्हापुरात आपटेनगरातील मामाकडे दीड महिन्यापूर्वी राहण्यास आली होती. शनिवारी सकाळी तिचे मामा, आजी, आजोबा हे कपडे धुण्यासाठी पंचगंगा नदीत शिंगणापूर बंधारा येथे गेले होते. त्यांच्यासोबत अंजलीही गेली होती.

तिने कपडे धुण्यासाठी आजीला मदतही केली. त्यानंतर ती नदीच्या पाण्यात कडेला बसून अंघोळ करीत होती. त्याच वेळी तिचा अचानक पाय घसरून ती खोल पाण्यात बुडाली. तिने केलेल्या आरडाओरड्यामुळे तिच्याकडे आजी-मामा धावले. तोपर्यंत ती बुडाली होती.

तातडीने मामा सचिन अरुण संकपाळ यांनी पाण्यात बुडून अंजलीला बाहेर काढले. तिच्या नाका-तोंडात पाणी शिरल्याने ती बेशुद्धावस्थेत होती. परिसरात पोहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या मदतीने तिला तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणले. तत्पूर्वी तिचा दुर्दैवी अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अंजलीचे वडील बाळासाहेब चव्हाण यांचा कबनूर येथे सलूनचा व्यवसाय आहे. आई घरकाम करते, तर मोठा भाऊ दहावीचे शिक्षण घेत आहे. शनिवारी दुपारी तिच्या मृतदेहाचे सीपीआर रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. तिच्या नातेवाइकांनी रुग्णालयाच्या परिसरात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर