क्रशखडी, वाळूच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:25 IST2021-09-23T04:25:53+5:302021-09-23T04:25:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शासनाने दगड उत्खननावर रॉयल्टीमध्ये ब्रासमागे २६० रुपयांची वाढ केल्याने क्रशखडी व वाळूच्या दरात वाढ ...

Crushing, increase in the price of sand | क्रशखडी, वाळूच्या दरात वाढ

क्रशखडी, वाळूच्या दरात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शासनाने दगड उत्खननावर रॉयल्टीमध्ये ब्रासमागे २६० रुपयांची वाढ केल्याने क्रशखडी व वाळूच्या दरात वाढ करण्याचा निर्णय काेल्हापूर जिल्हा क्रशर व खण ओनर्स वेलफेअर असाेसिएशनच्या सभेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील होते.

राज्य शासनाने दगड उत्खननावर रॉयल्टीमध्ये ४ जून २०२१ रोजी वाढ करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी ४०० रुपये ब्रॉस रॉयल्टी होती. त्यामध्ये २६० रुपये वाढ करत ६६० रुपये वसूल केली जाणार आहे. अगोदरच डिझेल, स्पेअरपार्टस्, ऑईल, ग्रीसची दरवाढ झाल्याने हा व्यवसाय करणे अवघड बनले आहे. त्यात शासनाने रॉयल्टीमध्ये मोठी वाढ करून व्यावसायिकांना झटका दिला आहे. त्यामुळे २० सप्टेंबरपासून दगडापासून तयार होणारी सर्व प्रकारची क्रशखडीचे दर प्रतिब्रास २८०० रुपये व वाळूचे दर ४२०० रुपये करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. यावेळी असोसिएशनचे सदस्य, सभासद उपस्थित होते. उपाध्यक्ष सदानंद पाटील यांनी आभार मानले.

... तर स्टाेन क्रशर बेमुदत बंद

रॉयल्टीमध्ये केलेली दरवाढ ही अन्यायकारक आहे. शासनाने ही दरवाढ मागे न घेतल्यास अथवा बांधकाम व रस्ते ठेकेदारांकडून दरवाढ न मिळाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्टोनक्रशर व गौण खनिज पुरवठा बेमुदत बंद करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला.

पूर्वीप्रमाणेच पास व्यवस्था करा

शासनाने आता ऑनलाईन पासची व्यवस्था केल्याने अडचणी येत आहेत. मुळात खणीत काम करणाऱ्या मजुरांचे शिक्षण फार कमी असते. या कामासाठी शिक्षित कामगार घ्यायचे म्हटले तर १५-२० हजार पगार द्यावा लागणार आहे. यासाठी पूर्वीच्या पद्धतीेने पास व्यवस्था करावी, अशी मागणीही सभेत करण्यात आली.

Web Title: Crushing, increase in the price of sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.