विरोधकांचे राजकारण हाणून पाडा

By Admin | Updated: July 9, 2015 00:27 IST2015-07-09T00:27:52+5:302015-07-09T00:27:52+5:30

आवाडे यांचे आवाहन : इचलकरंजी शहर कॉँग्रेस समितीत वह्या वाटप कार्यक्रम

Crush opponents' politics | विरोधकांचे राजकारण हाणून पाडा

विरोधकांचे राजकारण हाणून पाडा

इचलकरंजी : नगरपालिकेमध्ये विरोधकांकडून फक्त राजकारणच केले जात आहे. गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या नागरी सेवा-सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. झोपडपट्टीवासीयांची पुनर्वसनासाठी बांधण्यात आलेली घरकुले आता पूर्णावस्थेत असून, त्याचा योग्य लाभार्थ्यांना ताबा मिळण्यासाठी झोपडपट्टीवासीयांनी आंदोलन करावे, असे आवाहन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
इचलकरंजी शहर कॉँग्रेस समिती व नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी कामगार कल्याण ट्रस्ट आणि जवाहर सहकारी साखर कारखाना यांच्यावतीने गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. त्यावेळी माजी मंत्री आवाडे बोलत होते. आपल्या भाषणामध्ये आवाडे यांनी ‘अच्छे दिन’ आणू पाहणाऱ्या भाजप सरकारवर जोरदार टीका केली. कॉँग्रेस आघाडी सरकारने केलेल्या अनेक विकासकामांना मोडता घालून प्रत्येक कामात राजकारण आणले जात आहे आणि सर्वसामान्यांना दूर लोटले जात आहे, अशी टीका केली.
सुरुवातीला कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी स्वागत व अहमद मुजावर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विलास गाताडे, शामराव कुलकर्णी, आदींची भाषणे झाली. कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, चंद्रकांत इंगवले, नगरसेवक बाळासाहेब कलागते, पाणी पुरवठा सभापती रवी रजपुते, संजय केंगार, शेखर शहा, महावीर कुरुंदवाडे, अमृत भोसले, शेखर हळदकर, आदी उपस्थित होते. शेवटी पांडुरंग पिसे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

अविश्वास ठरावासाठी
जोरदार तयारी करावी
नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणून हा प्रस्ताव बहुमताने यशस्वी व्हावा, यासाठी जोरदार तयारी करावी, असे आवाहन आवाडे यांनी केले. त्यामुळे बिरंजे यांच्यावरील अविश्वास आणण्यासाठी कॉँग्रेसने वेगाने हालचाली सुरू केल्याचे संकेत मिळाले.

Web Title: Crush opponents' politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.