पन्हाळ्यावर पर्यटकांवी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:15 IST2021-07-12T04:15:50+5:302021-07-12T04:15:50+5:30
मार्च महिन्यापासून पन्हाळा कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने बंद आहे पण सध्या पडणारा रिमझिम पाऊस व ...

पन्हाळ्यावर पर्यटकांवी गर्दी
मार्च महिन्यापासून पन्हाळा कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने बंद आहे पण सध्या पडणारा रिमझिम पाऊस व पडणारे दाट धुके याची भुरळ पर्यटकांना खुणावू लागल्याने मोठ्या संख्येने पर्यटक पन्हाळ्यावर आले होते. तथापि पन्हाळ्याच्या आत सोडत नसलेने हिरमोड होऊन परत जात होते. वीकेंड लाॕॅकडाऊनचा फज्जा उडाला होता. पर्यटक निरनिराळ्या बहाण्याने आत येता जाते का पाहत होते, तथापि सर्वांना परत फिरावे लागले.
दरम्यान आज जिल्हा परिषद सदस्य पन्हाळ्यावर असलेने पन्हाळा गर्दीने फुलला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत पर्यटकांना पन्हाळा नाक्यावरुन बाहेर काढले.
फोटो-------
पन्हाळा नाक्याजवळ जमलेले पर्यटक