इचलकरंजीत रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:18+5:302021-08-21T04:28:18+5:30

भाऊ-बहिणीमधील प्रेम व स्नेह वृद्धिंगत करणाऱ्या या सणानिमित्त शहरातील गांधी पुतळा, के. एल. मलाबादे चौक, एएससी कॉलेज परिसर, सरस्वती ...

Crowds for shopping in the market on the occasion of Rakshabandhan in Ichalkaranji | इचलकरंजीत रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

इचलकरंजीत रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

भाऊ-बहिणीमधील प्रेम व स्नेह वृद्धिंगत करणाऱ्या या सणानिमित्त शहरातील गांधी पुतळा, के. एल. मलाबादे चौक, एएससी कॉलेज परिसर, सरस्वती मार्केट, डेक्कन चौक, शहापूर चौक अशा विविध भागांमध्ये राख्यांचे स्टॉल लागले आहेत. यावर्षी बाजारात विविध राख्या आल्या असून, बच्चे कंपनीसाठी गमतीशीर राख्या बाजारात आल्या आहेत. गेल्या १० दिवसांपासून रक्षाबंधनासाठी बाजारात राख्या उपलब्ध झाल्या होत्या. रक्षाबंधन काही तासांवर आल्यामुळे आता बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे.

यावर्षी राख्यांच्या किमतीत किरकोळ प्रमाणात वाढ झाली आहे. भावा-बहिणीसाठी कपलराखी, मोठ्यांसाठी बुलबुल राखी तसेच चांदीची मुलामा असलेल्या राख्याही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. या दिवशी एकमेकांप्रती प्रेमभावना, आदर व्यक्त करण्याचा तसेच भावाच्या हाताला धागेबंधन बांधून त्याच्याकडून आयुष्यभराचे संरक्षणाचे वचन घेण्याचा हा दिवस असतो.

लहान मुलांसाठी खास राख्या

गतवर्षीपेक्षा यावर्षी लहान मुलांसाठी खास राख्या आल्या असून, यामध्ये म्युझिक, तिरंगा, पबजी, डोरेमॅन, मोटू पतलू, पॅडमॅन, अवेन्जर, छोटा भीम, चांदीची राखी यांसारख्या विविध राख्या बाजारात दिसून येत आहेत.

फोटो ओळी

२००८२०२१-आयसीएच-०२

२००८२०२१-आयसीएच-०३

२००८२०२१-आयसीएच-०४

इचलकरंजीत विविध स्टॉलवर राखी खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.

छाया-उत्तम पाटील

Web Title: Crowds for shopping in the market on the occasion of Rakshabandhan in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.