कळंब्यासह उपनगरात पेट्रोल पंपावर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST2021-07-24T04:16:12+5:302021-07-24T04:16:12+5:30
त्यामुळे सायंकाळी पावसाने काही काळ उसंत घेताच सर्वच पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठ्या रांगांची मोठी गर्दी उसळली होती. वाहनात पेट्रोल ...

कळंब्यासह उपनगरात पेट्रोल पंपावर गर्दी
त्यामुळे सायंकाळी पावसाने काही काळ उसंत घेताच सर्वच पेट्रोल पंपावर वाहनांच्या मोठ्या रांगांची मोठी गर्दी उसळली होती. वाहनात पेट्रोल फुल्ल करण्याकडे सर्वांचा कल दिसून येत होता. त्यामुळे बहुतांश पेट्रोल पंपाबाहेर जवळपास अर्धा किलोमीटरवर रांगा लागल्या होत्या.
जुना वाशी नाका येथील पेट्रोल पंपावर तर भरपावसात पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. पावसाळ्यात किमान दैनंदिन गरजा भागविण्यासाठी प्रवासात अडचण येऊ नये म्हणून वाहनधारक गाड्या फुल्ल करून घेत होते. एकंदरीत गतवेळच्या पावसाळ्यातील पेट्रोल तुटवड्याचा अनुभव लक्षात घेऊन पावसाने खोळंबा होऊ नये म्हणून सर्वच पेट्रोल पंपावर गर्दी पाहावयास मिळाली.