रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:09+5:302021-09-18T04:25:09+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणाऱ्या कोयना आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस साधारण एक महिना बंद राहिल्या. तिरूपती, अहमदाबाद, दिल्ली, नागपूर, ...

Crowds of passengers in the reserved coaches of the train | रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी

रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणाऱ्या कोयना आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस साधारण एक महिना बंद राहिल्या. तिरूपती, अहमदाबाद, दिल्ली, नागपूर, गोंदिया, धनबाद या मार्गांवरील रेल्वे सुरू राहिल्या. तिकीट आरक्षित असेल, तरच या रेल्वेतून प्रवास करता येत होता. त्यामुळे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रवासी संख्या कमी होती. प्रादुर्भाव कमी झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून आठ एक्स्प्रेस रेल्वे धावत असून, त्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. या रेल्वेना जनरल डबे नसल्याने प्रवाशांना एक दिवस आधी तिकीट आरक्षण करावे लागत आहे. त्यामुळे आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. कोल्हापुरातून रेल्वेत ४० टक्के प्रवासी बसतात. त्यांची संख्या पुढे सांगली, मिरजमध्ये आणखी वाढते. ही गर्दी कमी करण्यास तिकीट दर आणि आरक्षण करण्याचा त्रास वाचविण्यासाठी जनरल डब्यांची सुविधा लवकर सुरू करण्याची मागणी प्रवाशांतून आग्रहाने होत आहे.

सर्व रेल्वेत स्थिती सारखीच

‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शुक्रवारी कोल्हापूर-तिरूपती आणि कोल्हापूर-नागपूर रेल्वेच्या आरक्षित डब्यांची शुक्रवारी पाहणी केली. त्यामध्ये प्रवाशांची ४० ते ५० टक्क्यांपर्यंत गर्दी दिसून आली. कोल्हापूरमधून धावणाऱ्या सर्व आठ एक्स्प्रेस रेल्वेमध्ये हीच स्थिती असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

रेल्वेत विक्रेते नाहीत

खाद्यपदार्थ, थंडपेय, पाणी, फळे, नाष्टा आदींसाठी प्लॅटफॉर्मवर असलेल्या स्टॉलवरूनच प्रवासी आवश्यक ते खाद्यपदार्थ, साहित्याची खरेदी करत आहेत. कोल्हापूरमधून सुटणाऱ्या रेल्वेमध्ये विक्रेते नसल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार तिकीट आरक्षित केले असेल, तरच नागरिकांना रेल्वेतून प्रवास करता येणार आहे. बोर्डाच्या सूचनेनुसार कोल्हापूरमधूनही सेवा पुरविण्यात येत आहे.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग

फोटो (१७०९२०२१-कोल-रेल्वे फोटो ०१, ०२,०३) : कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून शुक्रवारी नागपूरला जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेमधील आरक्षित डब्यांमध्ये ४० टक्के प्रवासी दिसून आले.

170921\17kol_3_17092021_5.jpg~170921\17kol_4_17092021_5.jpg

फोटो (१७०९२०२१-कोल-रेल्वे फोटो ०१, ०२,०३) : कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून शुक्रवारी नागपूरला जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेमधील आरक्षित डब्ब्यांमध्ये ४० टक्के प्रवासी दिसून आले.~फोटो (१७०९२०२१-कोल-रेल्वे फोटो ०१, ०२,०३) : कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून शुक्रवारी नागपूरला जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेमधील आरक्षित डब्ब्यांमध्ये ४० टक्के प्रवासी दिसून आले.

Web Title: Crowds of passengers in the reserved coaches of the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.