शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

corona virus Kolhapur : वीकेंड लॉकडाऊननंतर खरेदीसाठी झुंबड, वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 8:14 PM

corona virus Kolhapur : वीकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शहर गर्दीने फुलून गेले होते. लक्ष्मीपुुरी, राजारामपुरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, अंबाबाई मंदिर परिसरात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दुपारी एकपर्यंत शहरातील प्रमुख चौकांत आणि रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत राहिली.

ठळक मुद्देवीकेंड लॉकडाऊननंतर खरेदीसाठी झुंबडप्रमुख चौकांत आणि रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी

कोल्हापूर : वीकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शहर गर्दीने फुलून गेले होते. लक्ष्मीपुुरी, राजारामपुरी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, अंबाबाई मंदिर परिसरात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दुपारी एकपर्यंत शहरातील प्रमुख चौकांत आणि रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत राहिली.कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने वीकेंडला म्हणजे शनिवारी, रविवारी लॉकडाऊन कायम राखला. इतर दिवशी सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी चारपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वस्तू विक्रीची दुकाने सुरू करण्यास मुभा आहे.

दोन दिवसांच्या निर्बंधानंतर शहरातील अनेक दुकाने सोमवारी सकाळी सात वाजता चालू झाली. सकाळी दहानंतर बाजारपेठेत गर्दीला सुरुवात झाली. ती दुपारी एकपर्यंत राहिली. बिंदू चौक परिसर, लक्ष्मीपुरी बकरी बाजार, भाजी मंडई, पापाची तिकटी, शिवाजी चौक, ताराबाई रोड, गांधीनगरमध्ये खरेदीची झुंबड उडाली होती.दुचाकी, चारचाकी घेऊन अनेकजण खरेदीसाठी घराबाहेर पडताना दिसत होते. लक्ष्मीपुरीतील भाजी आणि फळ मार्केटमध्ये अक्षरश: झुंबड उडाली होती. येथे काही काळ सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र होते. वाहतूक आणि महापालिकेचे कर्मचारी येथे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करीत होते. पण दुपारी एकपर्यंत गर्दी कायम राहिली.

आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांसमोरही गर्दी झाली होती. ज्येष्ठ नागरिक पेन्शन व इतर कामांसाठी मोठ्या संख्येने आले होते. त्यांच्यासाठी काही बँकांनी दारात मंडप उभारून खुर्चीची व्यवस्था केली होती. तरीही बँकांसमोर अभ्यागतांची आणि ज्येष्ठ नागरिकांची रांग लागलेल्या दिसत होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर