शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भावाला राखी पाठविण्यासाठी कोल्हापुरात टपाल कार्यालयाबाहेर रांगा, काही ठिकाणी ‘सर्व्हर डाऊन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:06 IST

नव्या प्रणालीचा फटका

कोल्हापूर : दूरगावी असणाऱ्या भाऊरायाला रक्षाबंधनासाठी आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी लाडक्या बहिणींची लगबग सुरू आहे. मंगळवारी शहरातील सर्वच टपाल कार्यालयांत लोकांची चांगलीच गर्दी झाली. रेल्वेस्टेशनसमोरील टपाल कार्यालयासह काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. पोस्ट खात्याने सर्वच पोस्ट कार्यालयांत नवीन प्रणाली लागू केल्याने अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणींसह ‘सर्व्हर डाऊन’च्या समस्येला तोंड द्यावे लागले.राख्या पाठवण्याचे हक्काचे माध्यम म्हणून लाडक्या बहिणी दरवर्षी पोस्ट खात्याचा आधार घेते. रक्षाबंधनासाठी पोस्ट विभागदेखील सज्ज झाला आहे. यानिमित्ताने वाढणारी गर्दी लक्षात घेऊन विविध पोस्ट कार्यालयांत राखी पाठविण्यासाठीच्या स्पीड पोस्ट, तसेच ऑर्डिनरी बुकिंगसाठी स्वतंत्र आणि अतिरिक्त खिडक्या सुरू केल्या आहेत. शहरातील सर्वच पोस्ट कार्यालयांत रोज हजारो राख्यांच्या पाकिटांचे बुकिंग होत आहे. येत्या ९ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने पोस्ट कार्यालयांत गर्दी होते आहे.डाक विभागाने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गेल्या मंगळवारपासून कोल्हापुरातील मुख्य कार्यालयाने ‘एपीटी (ॲडव्हान्स्ड प्लॅटफॉर्म फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) अप्लिकेशन’ हे पुढच्या पिढीतील नवीन सॉफ्टवेअर लागू केले. मात्र, अनेक कार्यालयांना ‘सर्व्हर डाऊन’च्या समस्येला तोंड द्यावे लागले. त्यामुळे वेळ वाढवून द्यावी लागली. शहरातील रेल्वेस्टेशनसह अन्य पोस्ट कार्यालयांनाही दिवसभर ही समस्या जाणवली. त्यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागला, अनेक ठिकाणी लोकांच्या रांगा लागल्या होत्या.