शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चांदीचे वाण खरेदीसाठी कोल्हापुरातील हुपरीत राज्यातील व्यापाऱ्यांची धांदल, कोट्यवधींची उलाढाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 12:47 IST

चांदीच्या जोडव्यासह इतर वाणांनाही संपूर्ण महाराष्ट्रातील सराफ बाजारपेठेतून सध्या मोठ्या प्रमाणात मागणी

तानाजी घोरपडेहुपरी (कोल्हापूर) : चांदीच्या पावलांनी लक्ष्मी येते, अधिक मास समृद्ध करते. दर तीन वर्षांनंतर येणाऱ्या अधिक मासामध्ये विवाहित महिलांनी पायातील चांदीची जोडवी बदलण्याची हिंदू संस्कृतीत प्रथा आहे. त्यामुळे रौप्यनगरी हुपरी (ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर) मध्ये बनविल्या जात असलेल्या चांदीच्या जोडव्यासह इतर वाणांनाही संपूर्ण महाराष्ट्रातील सराफ बाजारपेठेतून सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. राज्यभरातील व्यापाऱ्यांची येथे झुंबड उडाली आहे.हुपरीत चांदी व्यवसाय करणारे पाच हजारांवर व्यापारी आहेत. देशभरातील सराफ बाजारात जाऊन दागिने पुरवठा करण्याचे काम दोन हजारांवर व्यापारी करतात. परंतु, यंदा माल कमी असल्याने खरेदीसाठी व्यापारीच हुपरीला येऊ लागले आहेत. येथील काही चांदी उद्योजक नियमितपणे जोडवी, वेढणी, बिचवा, फेरवा, मासोळी उत्पादन करीत असतात. अधिक महिन्यात बहुतांशी महिला आपल्या पायातील जोडवी एकतर बदलतात किंवा जुन्या वजनापेक्षा जास्त वजनाची जोडवी घडवून घेतात. साधारणपणे दहा ग्रॅमपासून १०० ग्रॅमपर्यंत वजनाच्या जोडव्यांची ( एक भार ते दहा भार) मागणी असते. नक्षी, शीरमाठ, पेढामाठ अशा विविध प्रकारची जोडवी बनविली जातात. जोडव्यांबरोबरच बिचवा, वेढणींनापण मोठी मागणी आहे. सध्या बाजारपेठेत शुद्ध चांदीचा पुरवठा अल्प प्रमाणात होत असल्याने चांदीचे वाण बनविण्याला मर्यादा येत आहेत. सोनारांनी हाताने बनविलेल्या जोडव्यापेक्षा विविध डिझाइनच्या सुबक व आकर्षक जोडवी आहेत. हुपरीतून हव्या त्या डिझाइनची जोडवी मागणी देऊन बनवून घेण्याला सराफ मंडळी प्राधान्य देत आहेत.

पूर्वी सोनार लोक हाताने जोडवी घडवत होते परिणामी उत्पादन कमी तर होतच होते; पण नक्षीकामालाही मर्यादा यायची. ही अडचण लक्षात घेऊन येथील उद्योजकांनी जोडवी बनविण्यासाठी आधुनिक मशिनरीची जोड देऊन वेगवेगळ्या डिझाइनची व्हरायटी बाजारात आणली आहे. - अरविंद पारगावे, जोडवी, वेढणी उत्पादक हुपरी. 

मागील अधिक मास कोरोनात आला होता. त्यामुळे कुणाला हौस करता आली नव्हती. यावेळचा अधिक मास तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर आल्यामुळे हुपरीतील चांदीच्या जोडाव्यासह सर्वच वाणांना चांगली मागणी आहे. - संजय सदाशिव माने, संचालक, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर