शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची गर्दी,महाद्वारातून मुख दर्शनासाठी वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 15:40 IST

Mahalaxmi Temple Kolhapur- करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी सलग दुसऱ्या रविवारी पर्यटकांनी गर्दी केली. महाद्वार खुले केल्याने मुख्य दर्शन रांगांबरोबरच मुख दर्शनासाठीही भाविकांची तितकीच गर्दी होती. तसेच मंदिराच्या आतील दुकाने सुरू झाल्याने येथेही वर्दळ होती.

ठळक मुद्देअंबाबाई दर्शनासाठी भाविकांची गर्दीमहाद्वारातून मुख दर्शनासाठी वर्दळ

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी सलग दुसऱ्या रविवारी पर्यटकांनी गर्दी केली. महाद्वार खुले केल्याने मुख्य दर्शन रांगांबरोबरच मुख दर्शनासाठीही भाविकांची तितकीच गर्दी होती. तसेच मंदिराच्या आतील दुकाने सुरू झाल्याने येथेही वर्दळ होती.कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नाताळची सुटी साधून कोल्हापूरला पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. या सुटया रविवारपर्यंत सुरू असल्याने या दिवशीदेखील मंदिराबाहेर भाविकांच्या रांगाच रांगा दिसत होत्या. दर्शनाची वेळ आता सकाळी सहा ते रात्री आठ अशी बारा तासांची करण्यात आल्याने भाविकांसाठी ही सोयीची बाब ठरली आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजायच्या आतच पूर्व दरवाज्याबाहेर रांगा होत्या.देवस्थान समितीने शुक्रवारपासून महाद्वार भाविकांसाठी खुला केल्याने देवीच्या मुखदर्शनाासाठीही मोठी गर्दी होत आहे. भाविक महाद्वारातून येऊन कासव चौक व गणपती चौक येथून देवीचे मुखदर्शन घेऊन जात होते. त्यामुळे येथे भाविकांची मोठी वर्दळ होती.उलाढाल वाढलीअंबाबाई मंदिर पूर्ण क्षमतेने खुले होऊन पर्यटकांची गर्दी वाढल्याचा परिणाम अर्थकारणावरही झाला आहे. येथील फुलवाल्यांपासून ते पूजेचे साहित्य, महाद्वार, जोतिबा रोडवरील फेरीवाले, इमिटेशन ज्वेलरी, हॉटेल्स, यात्री निवास, रिक्षावाले अशा सगळ्याच क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरReligious Placesधार्मिक स्थळेkolhapurकोल्हापूर