प्रवेश निश्चितीसाठी गर्दी
By Admin | Updated: July 12, 2014 00:43 IST2014-07-12T00:38:03+5:302014-07-12T00:43:03+5:30
अकरावी प्रवेश प्रक्रिया : तक्रार करण्याचा आज अखेरचा दिवस

प्रवेश निश्चितीसाठी गर्दी
कोल्हापूर : अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. आज, शुक्रवारअखेर कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी ३ हजार ४२२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. उद्या, शनिवारी तक्रारी नोंदविण्याचा अखेरचा दिवस आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने निवड यादी प्रसिद्ध करून गेल्या दोन दिवसांपासून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली. आजअखेर ३ हजार ४२२ विद्यार्थ्यांनी निवड यादीनुसार मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केले. यात विज्ञान शाखेची १ हजार ७३७, वाणिज्यमधील १ हजार १७८, तर कला शाखेसाठी ५०५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असताना देखील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेग आला होता. त्यामुळे विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, पालक यांची धावपळ सुरू होती. ---८५ तक्रारी अमान्य
प्रवेश प्रक्रिया समितीने नियुक्त केलेल्या तिन्ही तक्रार निवारण केंद्रांत आज ११९ तक्रारी दाखल झाल्या. यात विज्ञानच्या ९७ तक्रारी होत्या. त्यातील ७४ अमान्य, ८ प्रलंबित ठेवण्यात आल्या, तर ७४ अमान्य करण्यात आल्या. वाणिज्य शाखेतून २२ तक्रारी आल्या होत्या. त्यातील ११ अमान्य, तर ११ मान्य झाल्या.
तक्रार निवारण केंद्रे
१. कला : कमला कॉलेज
२. वाणिज्य : महावीर कॉलेज
३.विज्ञान : गोखले कॉलेज (प्रतिनिधी)