शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

Kolhapur: ऐन सुगीत चंदगड तालुक्यात टस्करासह पिल्लांचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 13:05 IST

चंदगड : तालुक्यात हत्तींचा कळप कायमच वास्तव्यास असला तरी अलीकडेच आलेला एक टस्कर आण्णा आणि त्याच्या दोन पिल्लांनी कळसगादे, ...

चंदगड : तालुक्यात हत्तींचा कळप कायमच वास्तव्यास असला तरी अलीकडेच आलेला एक टस्कर आण्णा आणि त्याच्या दोन पिल्लांनी कळसगादे, पार्ले, जेलुगडे परिसरात धुमाकूळ घातला असून उसाचे मोठे नुकसान केले आहे. ऐन सुगीत हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असलेले पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. चंदगड तालुक्यात हत्तीचा वावर या भागात ठरलेला असतो. दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान होते. नुकसान भरपाई वेळेत कधीच मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. उत्पादन खर्चाइतकाही दर पदरात पडत नाही. सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहे. वनविभाग सातत्याने हत्ती आपल्या कार्यक्षेत्रात सांभाळण्यात असमर्थ ठरले आहे. वनविभागाकडे पंचनाम्याशिवाय अन्य कोणतेच काम उरलेले नाही. हत्ती पिटाळून जंगलक्षेत्रात पाठवण्यात ते कमी पडत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.गेल्या आठ दिवसांपासून जांबरे, नागवे, उमगाव, कळसगादे, गुडवळे, पार्ले परिसरात हत्तींचा वावर आहे. गेल्या दोन दिवसांत कळसगादे गावातील खेमाना दळवी, गोविंद दळवी, पुंडलिक दळवी, ज्ञानेश्वर दळवी, भिकाजी दळवी, अनिल दळवी, संतोष दळवी या शेतकऱ्यांचेविशेषतः रायीकडच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस खाण्यापेक्षाही त्याच्या नाचण्याने मोठे नुकसान होत आहे.वास्तविक पाहता तालुक्यातील साखर कारखान्यांनी अग्रक्रमाने हत्तीबाधित क्षेत्रातील उसाची उचल करणे आवश्यक आहे. शेतकरी हत्तींच्या वाढत्या वावराने हतबल झाला असून त्यांना वनविभाग, साखर कारखाने यांच्या सहकार्याची गरज असून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे आवश्यक आहे.गणेश नावाचा टस्करही कलिवडे, किटवडे व जंगमहट्टी धरण परिसरात असून त्याच्याकडूनही पिकांचे नुकसान सुरू आहे. त्यामुळे वनविभागाने हत्ती हाकारा पथकाच्या मदतीने आमच्या पिकांचे रक्षण करावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागFarmerशेतकरी