पिशवी, सावर्डे बुद्रुक परिसरात रानडुकरांकडून पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:49+5:302021-08-27T04:27:49+5:30

सरूड : शाहूवाडी तालुक्यातील पिशवी, सावर्डे बुद्रुक परिसरात रानडुकरांच्या कळपाने येथील भुईमूग व रताळी पिकांचे मोठे नुकसान केले. रानडुकरांच्या ...

Crop damage from cattle in the bag, Savarde Budruk area | पिशवी, सावर्डे बुद्रुक परिसरात रानडुकरांकडून पिकांचे नुकसान

पिशवी, सावर्डे बुद्रुक परिसरात रानडुकरांकडून पिकांचे नुकसान

सरूड : शाहूवाडी तालुक्यातील पिशवी, सावर्डे बुद्रुक परिसरात रानडुकरांच्या कळपाने येथील भुईमूग व रताळी पिकांचे मोठे नुकसान केले. रानडुकरांच्या वाढत्या उपद्रव्यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत.

पिशवी व सावर्डे बुद्रुक परिसरात शेतकऱ्यांनी भात व नाचणा पिकासह भुईमूग व रताळीची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. हा परिसर डोंगररांगेच्या पायथ्याशी असल्याने गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांच्या कळपाचा वावर आहे. या रानडुकरांकडून रात्रीच्या वेळेस परिसरातील भुईमूग व रताळी पिकांचे नुकसान केले जात आहे. रात्रभर हा कळप येथील शेतांमध्ये बसत असतो. रानडुकरांकडून होत असलेल्या उपद्रव्यांमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने येथील शेतकरी हैराण झाले आहेत. वनविभागाने रानडुकरांच्या कळपाचा बंदोबस्त करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून होत आहे.

२६ सरूड शेती नुकसान

फोटो ओळी :

सावर्डे बुद्रुक (ता. शाहूवाडी) परिसरात रानडुकरांच्या कळपाकडून भुईमूग पिकाचे झालेले नुकसान.

(छाया : अनिल पाटील, सरूड)

Web Title: Crop damage from cattle in the bag, Savarde Budruk area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.