शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

'राजाराम' बंधाऱ्यावर मगरीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 18:09 IST

कसबा बावडा (ता. करवीर ) येथील राजाराम बंधाऱ्यावर शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास पुनाळला जाणाऱ्या युवकांना चक्क बंधाऱ्यावर आडवी निवांत थांबलेल्या सहा फुटांहून अधिक लांबीच्या मगरीचे दर्शन झाले.

ठळक मुद्दे'राजाराम' बंधाऱ्यावर मगरीचे दर्शन बंधारा आणि नदीच्या पाण्याची पातळी एकच झाल्याने आली बंधाऱ्यावर

कसबा बावडा: कसबा बावडा (ता. करवीर ) येथील राजाराम बंधाऱ्यावर शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास पुनाळला जाणाऱ्या युवकांना चक्क बंधाऱ्यावर आडवी निवांत थांबलेल्या सहा फुटांहून अधिक लांबीच्या मगरीचे दर्शन झाले.

कसबा बावडा रेस्क्यू फोर्सचे निलेश पिसाळ यांना ही माहिती कळताच त्यानी काही तरुणांना सोबत घेऊन बंधाऱ्यावर पाहणी करून मगर कुठे जाते हे पाहिले .मात्र काही वेळाने ही मगर वडणगे जॅकवेलच्या बाजूला नदीत गेली.गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीपात्रात मगरीचा वावर आढळून येत आहे. शुक्रवारी पंचगंगा नदी बंधार्‍यावरून वाहत होती. नदी आणि बंधारा यांची पाण्याची पातळी एकच होती त्यामुळे नदीतील मगरीला बंधाऱ्यावर अगदी सहज येता आले. ती बराच वेळ बंधाऱ्यावर थांबली होती. मोटरसायकलचा तिच्यावर उजेड पडला तरी ती पाण्यात जात नव्हती.आज शनिवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी मगरीचा शोध घेतला. मात्र त्यांना मगर आढळून आली नाही. मात्र तिच्या अस्तित्वाची ठसे आढळले. पंचगंगा नदी पत्रात मगरीचा वावर असल्याने नदीला सकाळी पोहण्यासाठी कोणीही जावू नये असे आवाहनन कसबा बावडा रेस्क्यू फोर्स च्या वतीने करण्यात आले आहे.

जमिनीवर असलेल्या मगरीची ताकद पाण्यात असल्यानंतर जास्त वाढते. त्यामुळे मगरीला पाण्यात असताना पकडणे काहीशी अवघड असते. आतापर्यंत पकडण्यात आलेल्या बहुतेक मगरी या पाण्याबाहेर आल्यानंतरच त्यांना पकडण्यात आले आहे . 

टॅग्स :wildlifeवन्यजीवDamधरणkolhapurकोल्हापूर