शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भादोलेत वारणा नदी परिसरात पकडली मगर, वन विभागाच्या ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 16:46 IST

मगरीच्या वावरामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

नानासाहेब जाधव भादोले : भादोलेत वारणा नदी परिसरातील मगरीस अखेर गावातील युवक, वनविभाग व निसर्गप्रेमी यांनी जेरबंद केली. सुमारे आठ फुट लांबीची ही मगर असून वनविभागाने ती ताब्यात घेतली आहे. मगरीच्या वावरामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान इसाबंदी नावाच्या याच परिसरात आणखी एक मगर असून वनविभागाने ती पकडावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.इसाबंदी नावाच्या शेतात शंकर यादव यांच्या शेतालगत पाण्याच्या खड्ड्यात दोन मगरीचे वास्तव्य होते. या मगरी खड्ड्यातून बाहेर येवून शेतात फिरत होत्या. यामुळे शेतकरी भीतीने शेतात जाण्याचे टाळत होते. दरम्यान काल, सोमवारी मध्यरात्री शेतात मोटार सुरु करायला गेल्यानंतर शेतकरी व मुख्याध्यापक रघुनाथ नांगरे व संजय पाटील यांना मगर दिसली. यावेळी त्यांनी गावातील युवकांना बोलावून वनविभागास देखील याबाबत माहिती दिली.यानंतर गावातील युवक, वनविभाग व निसर्गप्रेमी यांनी या मगरीस पकडले. अन् वन विभागाच्या ताब्यात दिली. यावेळी वन्य जीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार, स्वप्नील शहपुरे, वैभव आवळे, सागर भोकर, समर्थ सांगळे, अजय यादव, रोहन शिंदे, शितल ताटे, मदन बांगे, ओंकार पाटील, शेतकरी रघुनाथ नांगरे, तानाजी पाटील, भाऊ यादव, हर्षवर्धन पाटील, अमर पाटील, शंगार पाटील यांनी मगर पकडण्यास सहकार्य केले. ही मगर वन्य जीव अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग