...ही तर दलालांनी केलेली टीका

By Admin | Updated: October 21, 2015 00:45 IST2015-10-21T00:43:10+5:302015-10-21T00:45:44+5:30

हसन मुश्रीफ यांचा पलटवार : महादेवराव महाडिक यांनी स्पष्टीकरण द्यावे

... this is the criticism by the brokers | ...ही तर दलालांनी केलेली टीका

...ही तर दलालांनी केलेली टीका

कोल्हापूर : महाडिक घराण्याचा दहा पिढ्यांचा परवापर्यंत उद्धार करणारे परंतु आता लाचाराप्रमाणे त्यांच्या वळचणीला गेलेले माजी महापौर सुनील कदम यांनी माझ्यावर केलेल्या टीकेस आमदार महादेवराव महाडिक यांची संमती आहे का, याचा खुलासा आमदार महादेराव महाडिक यांनी तातडीने करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. माझ्यावरील टीका ही महाडिक यांच्या पाठिंब्याशिवाय खालच्या खाली दलालांनी केलेली असावी, असाही पलटवार मुश्रीफ यांनी केला.
रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार प्रारंभ मेळाव्यात मुश्रीफ यांनी महाडिक यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्यास सोमवारी ताराराणी आघाडीतर्फे सुनील कदम यांनी प्रत्त्युतर दिले व त्यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली. ही टीका कदम यांनी महाडिक यांना बरे वाटावे म्हणून केली आहे की त्या टीकेस आमदार महाडिक यांची संमती आहे हे स्पष्ट होण्याची गरज असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
पत्रकात म्हटले आहे, ‘माझी टीका ही व्यक्तिगत नव्हती. कोल्हापूर शहरात घराघरांत होणारी चर्चाच मी जाहीरपणे बोलून दाखविली. कारण एकाच कुटुंबातील ( तिघे वेगवेगळ््या पक्षांमध्ये असून त्या-त्या पक्षाची त्यांच्यामुळे होणारी कुचंबणा चव्हाट्यावर आणण्याचा माझा प्रयत्न होता. त्यामध्ये व्यक्तिगत टीका अगर ‘असंसदीय शब्द’ नव्हता.
त्या टीकेमध्ये एवढे अस्वस्थ होण्यासारखे काही नसताना त्याचा खुलासा करुन सुध्दा व्यक्तिगत टीका ही माझ्या संतापात भर घालणारी आहे. त्यामुळे या टीकेला आमदार महादेवराव महाडिक कुटुंबीयांचा पाठिंबा असेल असे मला वाटत नाही असे आमदार मुश्रीफ म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: ... this is the criticism by the brokers