सराईत गुन्हेगार तुषार चव्हाण जिल्ह्यातून २ वर्षे हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:01+5:302021-08-27T04:27:01+5:30

कोल्हापूर : खुनाचा प्रयत्न, खंडणी, गर्दी-मारामारी आदी गुन्हे नोंद असलेला शाहुपुरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार तुषार अरुण चव्हाण (वय २६ ...

Criminal Tushar Chavan deported from Sarai district for 2 years | सराईत गुन्हेगार तुषार चव्हाण जिल्ह्यातून २ वर्षे हद्दपार

सराईत गुन्हेगार तुषार चव्हाण जिल्ह्यातून २ वर्षे हद्दपार

कोल्हापूर : खुनाचा प्रयत्न, खंडणी, गर्दी-मारामारी आदी गुन्हे नोंद असलेला शाहुपुरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार तुषार अरुण चव्हाण (वय २६ रा. ८७२, शाहूपुरी ५ वी गल्ली, कोल्हापूर) याला दोन वर्षांकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. ही माहिती शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पो. नि. राजेश गवळी यांनी गुरुवारी दिली.

रेकॉर्डवरील गुन्हेगार तुषार चव्हाण याच्याविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात साधी दुखापत, गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर ५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव करवीर उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला होता, त्यानुसार त्याला दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून हद्दपार केल्याबाबतचे आदेश गुरुवारी देत त्याला हद्दपार करण्यात आले.

फोटो नं. २६०८२०२१-कोल-तुषार चव्हाण (आरोपी)

260821\26kol_9_26082021_5.jpg

फोटो नं. २६०८२०२१-कोल-तुषार चव्हाण (आरोपी)

Web Title: Criminal Tushar Chavan deported from Sarai district for 2 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.