उत्तम कांबळेंसह दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

By Admin | Updated: June 10, 2014 02:11 IST2014-06-10T01:55:21+5:302014-06-10T02:11:09+5:30

रास्ता रोको, तोडफोडीत १ लाख ३५ हजारांचे नुकसान

Criminal cases filed for 150 workers, including top officials | उत्तम कांबळेंसह दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

उत्तम कांबळेंसह दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आक्षेपार्ह प्रतिमा फेसबुकवर टाकल्याच्या निषेधार्थ काल, रविवारी रास्ता रोको आंदोलन, हॉटेल, केएमटी, एस.टी. बसेसची तोडफोड केल्याच्या संशयावरून ‘आरपीआय’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, सुग्रीव कांबळे यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांवर काल रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
‘आरपीआय’ आठवले गटाच्या सुमारे चारशे कार्यकर्त्यांनी शहरात निषेध रॅली काढून बंदचे आवाहन केले होते. यावेळी स्टेशन रोडवर संतप्त जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करीत पोलीस जीप, चार केएमटी बस, बेकरी, हॉटेल, पेट्रोलपंप, एटीएम सेंटर, हातगाड्या, हार-फुलांच्या टपऱ्यांवर तुफान दगडफेक करीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी मोर्चाचे नेतृत्व करणारे उत्तम कांबळे, सुग्रीव कांबळे यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांवर दाभोळकर कॉर्नर परिसरात रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला, तर अकरा मोटारसायकलींवरील अज्ञात ३५ कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हॉटेल, चार केएमटी बसेस, पेट्रोलपंप, बेकरी, हातगाड्यांवर दगडफेक करून सुमारे १ लाख ३५ हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Web Title: Criminal cases filed for 150 workers, including top officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.