शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेला ८५ लाखांचा गंडा घालणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी, प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:19 IST

चौकशी समितीही केली नियुक्त

कोल्हापूर : कसबा बावडा येथील ड्रेनेजलाईनचे काम न करताच बोगस कागदपत्रांच्या आधारे ८५ लाखांचे बिल उचलणाऱ्या ठेकेदार श्रीप्रसाद संजय वराळे याच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या प्रकरणात ज्यांची ज्यांची चूक झाली आहे त्यांना सोडणार नाही, असा इशाराच प्रशासकांनी दिला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता यांची चौकशी समितीही नेमण्यात आली.बिल उचलण्यासाठी अकौंट्स विभागातून एम.बी. घेण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी ज्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या अकौंट्स विभागातून तातडीने बदल्या कराव्यात, अशा सूचनाही मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.ठेकेदाराने स्वत:हून आपण बोगस कागदपत्रे सादर करुन ८५ लाखांचे बिल उचलल्याचे कबूल केल्यामुळे त्याच्यावर तातडीने फौजदारी करा, अशा सूचना दिल्याचे मंजुलक्ष्मी यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच या प्रकरणात ज्या ज्या विभागातील कर्मचारी दोषी आहेत, त्यांच्याकडून कशा चुका झाल्या आहेत याची जबाबदारी निश्चित करण्याकरिता चौकशी करण्यात येईल.अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती एका आठवड्यात सर्व प्रकरणाची कसून चौकशी करील. जे जे दोषी आहेत, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. कारवाईचे स्वरुप चौकशी समितीच्या अहवालावर ठरविले जाईल, असे त्यांनी सांगितले.मिसाळ चोवीस तासांत खुलासा द्या : मंजुलक्ष्मीमुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ यांनी या प्रकरणात अद्याप खुलासा दिलेला नाही, याकडे लक्ष वेधले असता त्यांना २४ तासांत खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे. यातून कोणाची सुटका नाही, असे मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.

आठवड्यात अहवालचौकशी समितीला एक आठवड्यात अहवाल देण्याची सूचना दिली आहे. एका आठवड्यानंतर महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे स्वरुप स्पष्ट होईल.

ठेकेदार ब्लॅकलिस्टठेकेदार श्रीप्रसाद वराळे याच्यावर तात्काळ ब्लॅकलिस्टची कारवाई करण्यात आली आहे. त्याने यापूर्वी महापालिकेची अनेक कामे केली असून, त्यासाठीची ठेवलेली अनामत रक्कम जप्त करण्याची सूचनाही प्रशासकांनी प्रशासनाला दिली आहे.