सचिन तोडकर, काटे, पाटीलसह दहा जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:33 IST2021-06-16T04:33:47+5:302021-06-16T04:33:47+5:30

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सचिन तोडकर, भगवानराव काटे, दिलीप पाटील यांच्यासह ...

Crimes against ten persons including Sachin Todkar, Kate and Patil | सचिन तोडकर, काटे, पाटीलसह दहा जणांवर गुन्हे

सचिन तोडकर, काटे, पाटीलसह दहा जणांवर गुन्हे

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सचिन तोडकर, भगवानराव काटे, दिलीप पाटील यांच्यासह एकूण १० मराठा आंदोलकांवर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

उपमुख्यमंत्री पवार व मंत्री राजेश टोपे हे कोल्हापूर दौऱ्यावर आल्याने त्या पार्श्वभूमीवर मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी मराठा आंदोलकांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयाशेजारी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाबाबत प्रतिबंधित आदेश लागू असताना व त्याबाबत त्याची माहिती आंदोलकांना दिलेली असतानाही त्याकडे त्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष करून आदेशाचा भंग केला. त्या पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलिसांनी १० आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदवले. सचिन दिलीप तोडकर (आझाद चौक), स्वप्नील बाबासाहेब पार्टे (सनगर गल्ली, मंगळवार पेठ), भगवानराव विलासराव काटे (मुक्त सैनिक वसाहत), दिलीप मधुकर पाटील (मुक्त सैनिक वसाहत), वीरेंद्र विलासराव मोहिते (जासूद गल्ली, मंगळवार पेठ), नितीन शिवाजीराव देसाई (टेंबलाईवाडी), पंकज दिगंबर कडवकर (कदमवाडी), जयश्री सुरेश वायचळ (शिवाजी उद्यमनगर), धनश्री सचिन तोडकर, रेणुका दिलीप तोडकर (दोघे रा. आझाद चौक) यांच्यावर गुन्हे नोंद झाले आहेत.

Web Title: Crimes against ten persons including Sachin Todkar, Kate and Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.