चोरीप्रकरणी एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:46 IST2021-02-06T04:46:07+5:302021-02-06T04:46:07+5:30

कोल्हापूर : राजेंद्रनगरातील स्वातंत्र्यसैनिक काॅलनीतील एका घरातील तीन हजार किमतीचे लोखंडी अँगल चोरून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला. श्रीनाथ ...

Crime on one of the theft cases | चोरीप्रकरणी एकावर गुन्हा

चोरीप्रकरणी एकावर गुन्हा

कोल्हापूर : राजेंद्रनगरातील स्वातंत्र्यसैनिक काॅलनीतील एका घरातील तीन हजार किमतीचे लोखंडी अँगल चोरून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला. श्रीनाथ लोंढे (राजेंद्रनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. संकेत हिंमतराव पाटील (वय २६) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पाचगावातून दुचाकी लंपास

कोल्हापूर : पाचगावातील प्रथमेश अपार्टमेंटच्या खाली उभी केलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी हर्षवर्धन भानुदास खडके ( वय २२) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

लोखंडी रॉडने मारहाण

कोल्हापूर : गॅरेजच्या दारात बसू नका, असे सांगितल्याच्या रागातून दोघांनी तरुणास लोखंडी राॅडने मारहाण करून जखमी केले. यात रवींद्र सहदेव कांबळे (वय २१, रा. कळंबा) हा तरुण जखमी झाला. मारहाणीचा हा प्रकार गुरुवारी (दि. ३) रात्री साडेआठ वाजता घडला. याप्रकरणी सागर महादेव जाधव (रा. कळंबा) याच्यासह अन्य एका संशयितावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Crime on one of the theft cases