कोल्हापुरात गुन्हेगारी वाढलीआबा.

By Admin | Updated: July 17, 2014 00:37 IST2014-07-17T00:36:40+5:302014-07-17T00:37:04+5:30

‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांची मागणी . गुन्हेगारांवर आता कारवाई करा

Crime in Kolhapur grew. | कोल्हापुरात गुन्हेगारी वाढलीआबा.

कोल्हापुरात गुन्हेगारी वाढलीआबा.

 कोल्हापूर : ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे, चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरू असेल, त्या ठाण्यातील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला होता. कोल्हापूर शहर व जिल्ह्यात दरोडे, घरफोड्या, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अवैध धंदेही वाढले आहेत. त्यामुळे आर. आर. पाटील यांनी आता कारवाई करून दाखवावी, असे आव्हान येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिले आहे. याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात शिंदे यांनी म्हटले आहे की, मोटारसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील गंठण लंपास करण्याचे प्रमाण वाढले आहे. एखादी महिला पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायला गेली की, तिला गळ्यात गंठण का घालता? असा सवाल पोलीस करतात. शहरातील रेल्वेस्थानक, एस.टी. स्टॅँड येथे जबरी चोऱ्या, तसेच बसमधून पैसे चोरी, महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याचे प्रकार वाढले आहेत. फुलेवाडी परिसरात वेश्या व्यवसाय चालत होता. त्यावर काहीच कारवाई केली नाही. महिलांच्या दागिन्यांची दिवसाढवळ्या लूट होत असताना पोलीस काहीच पायबंद घालणार नसतील, तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

Web Title: Crime in Kolhapur grew.