क्राईम संक्षिप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST2020-12-31T04:23:26+5:302020-12-31T04:23:26+5:30

कोल्हापूर : येथील राजारामपुरी तिसऱ्या गल्लीमध्ये मोबाईलवरून मटका घेणाऱ्या विराज कुमार सोनवले (वय ३१, रा. विक्रमनगर) या संशयितास राजारामपुरी ...

Crime Brief | क्राईम संक्षिप्त

क्राईम संक्षिप्त

कोल्हापूर : येथील राजारामपुरी तिसऱ्या गल्लीमध्ये मोबाईलवरून मटका घेणाऱ्या विराज कुमार सोनवले (वय ३१, रा. विक्रमनगर) या संशयितास राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोकडसह मोबाईल असा १० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मालकासह पाचजणांवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेल्या इतर संशयितांची नावे- मालक किरण पाटील (रा. उचगाव), सुजित साठे, प्रदीप गुरव, महेश निपाणीकर अशी आहेत.

मंगळवार पेठ परिसरातील रंग विक्रेत्‍यावर गुन्‍हा

कोल्हापूर : कंपनीच्‍या परवानगीशिवाय रंग विक्री करून कॉपीराईट नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्या मंगळवार पेठ परिसरातील वैभव विनायक भाेसले (रा. शांतिनगर, पाचगाव) या विक्रेत्‍यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला. नंगीवली चौक परिसरातील श्री सेल्‍स एजन्‍सीज्‌ दुकानात कंपनीच्‍या पथकाने छापा टाकला. त्यात बनावट पेंटचा डबा जप्‍त केला. त्याची तपासणी केल्‍यानंतर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी नीलेशकुमार रामशीश महंतो (रा. दिल्‍ली) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

Web Title: Crime Brief