खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला अटक

By Admin | Updated: July 5, 2015 01:09 IST2015-07-05T01:09:12+5:302015-07-05T01:09:12+5:30

दाभोळकर कॉर्नर येथील घटना : दमदाटी करून रिक्षाही नेली

Crime arrested for demanding ransom | खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला अटक

खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला अटक

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथे चालकाला दमदाटी करून त्याची हौदा रिक्षा लंपास करून वीस हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शनिवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी किरण दड्डाप्पा माने (वय रा. इंदिरानगर झोपडपट्टी, शिवाजी पार्क) असे त्याचे नाव आहे. त्याचा भाऊ किशोर हा फरार असून, दोघांनाही तडिपार करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, लक्ष्मण रोहिदास आयरे (३२, रा. साळोखे पार्क) हे आपल्या भाडोत्री व्यवसायाकरिता असलेल्या हौदा रिक्षा (एमएच ०९ सीयू २६१६) मधून सदर बझार येथील भाडे सोडून दाभोळकर कॉर्नर येथे येऊन थांबले. दरम्यान, शेजारील गाडीवर ते चहा पिण्यासाठी गेले असता संशयित किरण माने व त्याचा भाऊ किशोर माने या दोघांनी त्याठिकाणी येऊन आयरे यांना नाव, पत्त्याबाबत विचारणा करीत दमदाटी केली. यावेळी त्यांच्या हातातील चावी हिसकावून घेत रिक्षा घेऊन गेले. यावेळी जाताना त्यांनी रिक्षा हवी असेल, तर वीस हजार रुपये घेऊन विक्रम हायस्कूलच्या शेजारील मैदानावर येण्यास सांगितले. त्यानंतर याप्रकरणी आयरे यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विलास भोसले व त्यांच्या सहकार्यांनी संंशयित किरण माने याला महालक्ष्मी नगर, कदमवाडी परिसरात फिरताना अटक केली. त्यांच्याकडून अ‍ॅपे रिक्षाही जप्त केली. त्याचा भाऊ किशोर पसार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Crime arrested for demanding ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.